शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तिन्ही मुंडे भगिनी वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुक रिंगणात; धनंजय मुंडेंनी केला नाही अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 20:08 IST

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले

- संजय खाकरेपरळी: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पाठोपाठ आज त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे व त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी ही वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेच्या निवडणुकीसाठी 16 मे  रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. निवडणुकीसाठी आज खासदार प्रीतम मुंडे, ऍड यशश्री मुंडे, प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे यांनी अर्ज दाखल केले. तसेच आमदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड, बीड जिल्हा परिषदेचे माजी गट नेते अजय मुंडे व इतरांचे अर्ज दाखल झाले. मात्र, आ. धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. 

१ जून अर्ज मागे घेण्याची तारीखदरम्यान, काल 15 मे रोजी पंकजा मुंडे, फुलचंद कराड यांच्यासह 15 जणांचे अर्ज दाखल झाले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी निवडणूक होते आहे. त्यासाठी एकूण 50 अर्ज प्राप्त झाल्याची जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था तथा माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी दिली. 18 मे ते 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे  घेता येणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीचे खरेचित्र एक जून रोजी स्पष्ट होणार आहे. 

आज 35 जणांचे अर्ज दाखलप्रज्ञा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, यशश्री गोपीनाथराव मुंडे, सुमन फुलचंद कराड,   अजय मुंडे, वाल्मीक कराड, विनायक गडदे, अंगद मुंडे, सुरेश माने, विजय माळी, बंकटराव कांदे ,रेशीम कावळे,पांडुरंग फड ,बळीराम गडदे, सतीश मुंडे ,शिवाजी मोरे ,केशव माळी, प्रभाकर माने ,ज्ञानोबा मुंडे, हरिभाऊ गुट्टे सुधाकर सिनगारे ,संजीवनी गुट्टे, हरिभाऊ देशमुख,  सचिन दरक,  ,नारायण पारवे, मंचक घोबाळे ,सत्यभामा आघाव, सुशीला मुसळे, ज्ञानेश्वर शिंदे ,श्रीराम मुंडे कुंडलिक मुंडे ,वसंत राठोड, चंद्रकेतू कराड , विनायक गुट्टे, विठ्ठल नागरगोजे 

15 मे रोजीचे उमेदवारी अर्जपंकजा मुंडे, फुलचंद कराड ,  सूर्यकांत रामकृष्ण मुंडे, बाबासाहेब शंकरराव शिंदे ,रामकिशन घाडगे  ,गोदाबाई गीते ,विनायक गडदे ,राजेश गीते ,शिवाजी गुट्टे, सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे या 11 जणांनी  15 मे रोजी  15 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

निवडणुक कार्यक्रम: 10-05-2023- ते 16-05-202: नामनिर्देशन पञ भरणेदि 17-05-2023 : छाननीदि 18-05-2023 ते दि 01-06-2023: माघारदि02-06-2023: चिन्ह वाटप दि 11-06-2023: मतदान दि 12-06-2023: मतमोजणी

टॅग्स :BeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे