शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क अभियानचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:56 IST

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दोन तास रखरखत्या उन्हात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात दोन तास रखरखत्या उन्हात मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.५ मार्च राजी संजय ताकतोडे यांनी येथील बिंदुसरा धरणात मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अ, ब, क, ड प्रमाणे ५ टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जलसमाधी घेतली आहे. यामुळे राज्यातील सर्व मातंग समाज शासनाच्या विरोधात पेटून उठला आहे. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण हे उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिलेले आहे. १३ टक्यांमध्ये मातंग समाज हा उपेक्षितच आहे. उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजाला १३ टक्क्यात वेगळा कोटा ठेवून बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्यासाठी शासनाने मातंग समाजाला वर्गीकरण करून देण्यात यावे याशिवाय मातंग समाज हा मुख्य प्रवाहात येणार नाही, मयत संजय ताकतोडे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून ५० लक्ष रूपये देण्यात यावेत, मातंग समाजासाठी शासनाने घोषित केलेल्या स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात यावी, मातंग समाजासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करावेत, लहूजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनास काँग्रेस अनुजातीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, मल्हार सेनेचे विलास नेमाणे, दशरथ सुतार, प्रदीप तांबे, बाबा टाकणखार, शेख रशीद, तात्या पांचाळ यांनी पाठिंबा दिला. बाबासाहेब मुजमुले, मधुकर कांबळे, आप्पा भारस्कर, रमेश गवळी, बंडू खंडागळे, महादेव उमाप, विष्णू उगले, परमेश्वर अडागळे, अशोक ढगे, विवेक जाधव, दयालसिंग टाक, कैलास आवाड, अमोल ढगे, आदर्श मुजमुले, खंडू खंडागळे, उल्हास मुजमुले, प्रल्हाद दळवी, अनिकेत वाघमारे, खैरूल्ला खान यांचेसह मानवी हक्क अभियान व बहुजन मजूर पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास मानवी हक्क अभियान, बहूजन मजुर पक्ष आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश घोडे यांनी दिला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनSC STअनुसूचित जाती जमाती