शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 20:01 IST

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे.

- संजय खाकरेपरळी: तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव व वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या माजी चेअरमन पंकजा गोपीनाथराव मुंडे, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन फुलचंद कराड, माजी संचालक शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे यांच्यासह 15 जणांनी आपले नाम निर्देशनपत्र आज दाखल केले आहेत.

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी दि 10 ते 16 मे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे. आज संचालकपदाच्या जागेसाठी 15 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तर 16 मे रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने मंगळवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होणार आहे. 

आज यांनी केले अर्ज दाखल पंकजा गोपीनाथराव मुंडे, फुलचंद कराड ,  सूर्यकांत रामकृष्ण मुंडे, बाबासाहेब शंकरराव शिंदे ,रामकिशन घाडगे  ,गोदाबाई गीते ,विनायक गडदे ,राजेश गीते ,शिवाजी गुट्टे, सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे या 11 जणांनी एकूण 15 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंकजा मुंडे यांनी महिला राखीव प्रतिनिधी व व्यक्ती उत्पादक सभासदांनी निवडून द्यायचा प्रतिनिधी नाथरा या गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर फुलचंद कराड यांनी व्यक्ति उत्पादक सभासदांनी निवडून द्यावयाचा गटातून व अन्य एका गटातून अर्ज दाखल केला आहे तसेच राजेश गीते व सतीश मुंडे यांनी दोन गटात अर्ज भरले आहेत. 

पुन्हा मुंडे भाऊ- बहिण आमनेसामने वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव व वैद्यनाथ कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सुरू केली आहे. दोघांनी पॅनल उभे करण्याच्या दृष्टीने व्युव्हरचना आखली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष महानंदचे संचालक फुलचंद कराड हे ही कारखाना निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड