शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

साडेतीन टन कांदा विकून हाती भोपळा, शेतकऱ्यालाच १८०० रुपयांची करावी लागली पदरमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 12:15 IST

७० हजार रुपये खर्च करून पदरात १ रुपयाही नाही पडला; तिकिटालाही पैसे उरले नव्हते

बीड : बाजारात भाव पडल्याने कांद्याने उत्पादक शेतकरी आणि कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणले आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून पदरात काहीच पडले नाही, उलट अडत व्यापाऱ्याला १८०० रुपये देण्याची वेळ बीड तालुक्यातील जैताळवाडी येथील भागवत सोपान डांबे या शेतकरी कुटुंबावर आली. ७० हजार रुपये खर्च करून कांद्याचा एक रुपयाही पदरात न पडल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आम्ही जगायचे कसे ? मुलाचे शिक्षण करायचे कसे, असा प्रश्न व्यवस्थेला केला आहे.

जैताळवाडी येथील भागवत डांबे यांनी दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली. महागाचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा ७० हजार रुपये खर्च केला. १२० गोण्यात भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला. कांदा विक्री केल्यानंतर हाती पडलेली पट्टी पाहून आणि आणखी १८३२ रुपये जमा करण्याचे अडत्याने सांगितल्याने भागवत डांबे व मुलाला धक्काच बसला. गावाकडून पैसे मागवून घेतले. तिकिटासाठी शंभर रुपयेदेखील उरले नव्हते. रिकाम्या हाताने आलेल्या भागवतरावांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कुटुंबही रात्रभर रडले. जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकरी कुटुंबाने केला.

काहीच हाती लागले नाहीकांदा चांगला निघाल्याने किमान दीड लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा त्यांना होती. यातून मुलांचे शिक्षण, लग्न, घरप्रपंच चालवता येईल, असे वाटले होते; पण काहीच हाती लागले नाही.- भागवत डांबे, शेतकरी, जैताळवाडी

लेकरांनी कष्ट केले, आता चिंतालेकरांनी काबाडकष्ट करून कांदा पिकवला. त्याने दिवस रात्र मेहनत केली. काढण्यासाठी मजूर मिळत नव्हते. मीही मदत केली. खर्च खूप झाला; पण त्याच्या हातात काहीच पडले नाही. सोलापूरहून येताना भीक मागून दुसऱ्याकडून पैसे घेऊन माझे लेकरू आले आता इकडे तिकडे फिरत आहे. घर चालवायची चिंता त्याला सतावत असल्याचे भगवान डांबे यांच्या आई कमलबाई यांनी सांगितले.

साडेतीन टन कांदा विकून रुपया मिळत नसेल तर जगायचे कसे?कांद्याच्या उत्पन्नातून माझे शिक्षण होईल अशी अपेक्षा होती. मात्र, कांद्याचे बिल आणि पट्टी पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. उलट अठराशे रुपये अडत व्यापाराला देऊन रिकामे यावे लागले. साडेतीन टन कांदा त्यातून एक रुपया मिळाला नसेल तर आम्ही जगायचे कसे सांगा, असा प्रश्न शेतकरी पुत्र संदीप डांबे याने केला.

कांद्याला मिळाला ५० रुपये क्विंटल भाव१) भगवानराव डांबे १५५० किलो कांद्याचे ७७५ रुपये आले. बाजारातील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २१५८ रुपये झाला.त्यांना मायनस पट्टी मिळाली. शेतकऱ्याला पदरचे १३८३ रुपये अडत्याला द्यावे लागले.

कांद्याला मिळाला १०० रुपये क्विंटल भाव२) डांबे यांनी २०११ किलो कांदा विकला असता शंभर रुपये क्विंटल भाव मिळाला. फक्त २१३५.२० रुपये पट्टी आली. अडत्याकडील हमाली, तोलाई आणि इतर खर्च २५८३.८९ आला. ४४८.६९ रुपये शेतकऱ्याला पदरचे भरावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीonionकांदाBeedबीड