शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

पाच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पंकजा मुंडे आमदार, लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसन

By सोमनाथ खताळ | Updated: July 15, 2024 13:45 IST

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने जिल्हाभरात जल्लोष केला जात असून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षाही समर्थक व्यक्त करत आहेत.

बीड : मागील पाच वर्षांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सुरू असलेला राजकीय वनवास शुक्रवारी संपला. २०१९ विधानसभा आणि २०२४ लोकसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतरही भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन आमदार केले आहे. मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याने जिल्हाभरात जल्लोष केला जात असून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षाही समर्थक व्यक्त करत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावात लढत झाली होती. यामध्ये धनंजय मुंडे यांनी विजय संपादन केला. त्यानंतर पंकजा मुंडे फार सक्रिय नव्हत्या. मध्यंतरीच्या काळात त्यांना पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याच्या टीकाही केल्या जात होत्या. राज्यातील नेत्यांबद्दल त्यांनी अनेकदा खदखदही व्यक्त केली होती. त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. परंतु त्या भाजपसोबत एकनिष्ठ राहिल्या. त्याचाच एक भाग म्हणून त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी दिली. परंतु यावेळी जातीय राजकारण झाल्याने पंकजा मुंडे यांना फटका बसला आणि अवघ्या साडेसहा हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांचे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन आमदार केल्याने त्यांचा राजकीय वनवास संपून पाच वर्षांनंतर पुनर्वसन झाले आहे.

मंत्रिपद मिळणार का?पंकजा मुंडे यांची ओबीसी नेत्या म्हणून ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत जातीय राजकारणाचा फटका पंकजा यांच्यासह अनेक उमेदवारांना बसला. एवढेच नव्हे तर राज्यात महायुतीला अपेक्षेप्रमाणे यशही आले नव्हते. या अपयशामुळेही भाजपने पंकजा यांना विधानपरिषदेवर घेत ओबीसी नेत्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. पंकजा मुंडे आता आमदार झाल्या आहेत, पण त्यांना मंत्रिपद मिळणार का? याकडेही लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडेंना डावलण्याचा प्रयत्न२०१९ च्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचे कुठेही पुनर्वसन झाले नाही. भागवत कराड यांना राज्यसभेवर घेतले आणि मंत्री केले. तर लातूरमधून रमेश कराड यांना आमदार केले. कर्जत-जामखेड मतदारसंघातून पराभूत झालेले राम शिंदे यांनाही आमदार केले. येथे जातीय समीकरणे पाहिले गेली, परंतु पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला नव्हता. राज्यातील अंतर्गत राजकरणाचा फटका मुंडेंना बसला होता. त्यांना वारंवार डावलण्याचा प्रयत्नही झाल्याचे अनेकदा समोर आले होते.

आता बहीण प्रीतम मुंडेंचे काय?भाजपने दोन वेळा पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना आमदार करून पुनर्वसन केले आहे, हे खरे असले तरी त्यांची बहीण डॉ. प्रीतम मुंडे या अजूनही विस्थापित आहेत. डॉ. मुंडे या सलग दोन वेळा खासदार झालेल्या आहेत. यावेळी त्यांची उमेदवारी कट करून पंकजा यांना दिली होती. त्यांचेही पुनर्वसन पक्ष करणार का? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BeedबीडVidhan Parishadविधान परिषदPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा