शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमधील ऊसतोड मजुरांसाठी ‘आयुर्मंगलम’नंतर ‘मिशन साथी’ योजना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:18 IST

अजित पवारांच्या हस्ते होणार सुरुवात : प्रत्येक गटात एक आरोग्य साथी महिला

बीड : जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांसाठी ऑक्टोबर २०१० मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते ‘आयुर्मंगलम’ ही योजना सुरू झाली होती. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आता पुन्हा एकदा ‘मिशन साथी’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ७) याची सुरुवात होणार आहे. ‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच त्यांचे आरोग्य व इतर सुविधांसाठी ‘आयुर्मंगलम’ ही योजना सुरू करण्यात आली होती. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षाने ही योजना सक्षम राहिली नाही. त्यामुळेच २०१९ मध्ये ऊसतोडीला जाणाऱ्या महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समितीने नवीन ‘एसओपी’ ठरवून दिल्या. त्याचीही सुरुवातीचे एक-दाेन वर्षच प्रभावी अंमलबजावणी झाली. आता त्याकडेही दुर्लक्ष झाले.

‘लोकमत’ने प्रकाश टाकल्यावर जाग२ जून रोजी ‘लोकमत’ने २०२५ पूर्वी ८४३ ऊसतोड कामगारांची शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त प्रकाशित करून मुद्द्यावर प्रकाश टाकला. त्यानंतर बीडपासून ते दिल्लीपर्यंत खळबळ उडाली. हाच मुद्दा संसदेतही चर्चेत आला. त्यानंतर प्रशासन आणि शासन उपाययोजना करण्यासाठी धावपळ करत आहे. याचा लाभ ऊसतोड मजूर महिलांना होणार आहे.

२०१९ मध्ये काय घडले?एप्रिल २०१९ मध्ये गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा मुद्दा ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता. त्याच्या चौकशीसाठी विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०१९ रोजी समिती गठित केली. तेव्हा केलेल्या सर्वेक्षणात ८२ हजारांपैकी १३ हजार महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर २१ जून २०१९ रोजी अतिरिक्त संचालकांनी एसओपीसंदर्भात पत्र काढत शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी बंधनकारक केली.

‘मिशन साथी’ योजना काय?या योजनेतून ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून नोंदणी करत प्रत्येकाला ओळखपत्र देणार. महिलांची नियमित आरोग्य तपासणी होणार. प्रत्येक गटात (टोळी) एक महिला कामगारच ‘आरोग्य साथी’ म्हणून काम करणार. तिला आरोग्य विभागाकडून प्रशिक्षण देऊन प्रथमोपचार किट देणार. गावांतील आशाताईंसह इतर आरोग्य कर्मचारी तिच्या संपर्कात राहणार. दुसऱ्या जिल्ह्यात, परराज्यात गेल्यावरही तेथून ती बीडमध्ये संपर्क साधणार.

गटातीलच एक महिला ‘आरोग्य साथी’‘मिशन साथी’ ही योजना ७ ऑगस्ट रोजी ‘लाँच’ करत आहोत. यात गटातीलच एक महिला ‘आरोग्य साथी’ म्हणून काम करेल. नोंदणी, ओळखपत्र, योजनांची माहिती पुस्तिका हे सर्व कामगारांना देणार आहोत. तसे नियोजन आहे.- विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखाने