शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शेतीला तंत्रज्ञानाची जोड; पिकावर ड्रोनद्वारे कीटकनाशकाच्या फवारणीने वेळ आणि खर्चाची बचत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 20:11 IST

सध्या शेतकऱ्यांना मशागत, श्रमाची कामे करण्यासाठी पुरेसे मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे

- दीपक नाईकवाडे केज (बीड) :शेतकरी आता नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या सहाय्याने शेतात कीटकनाशकांची फवारणी केली त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्हीमध्ये बचत होणार आहे. 

सध्या शेतातील कामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना अंतरगत मशागत, श्रमाची कामे करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यातच वाढीव मजुरी देऊनही मजूर वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील इस्थळ येथील प्रगतिशील शेतकरी हनुमंत गोपीनाथ काळदाते व अशोक नामदेव शिंदे यांनी कृषी सहाय्यक गोविंद टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. या शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे सोयाबीन पिकावर यशस्वीरीत्या फवारणी केली. यामुळे शेतकऱ्यांचा पैसा, वेळ आणि श्रमाची  बचत होत आहे.  यावेळी ड्रोनद्वारे सुरू असलेली सोयाबीन फवारणी पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. 

शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवा ड्रोनद्वारे कमी वेळेत आणि कमी खर्चात फवारणी शक्य आहे. मनुष्यबळापेक्षा अवघ्या अर्ध्या दरात ड्रोनने फवारणी होते. - गोविंद टोपे, कृषी सहायक

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीFarmerशेतकरी