लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या पोलीस अधिकारी - कर्मचाºयांवर कारवाई केली. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करुन सुरक्षितता बाळगावी तसेच सहकार्य बाळगावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी १७ डिसेंबरपासून जिल्ह्यात सर्वत्र हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. अगोदर जनजागृतीबरोबरच पोलीस अधिकारी - कर्मचाºयांना शिस्त लावली. शुक्रवारपासून पोलिसांवर कारवाईला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी अधीक्षक कार्यालयासमोर दहा कारवाया झाल्या.सोमवारपासून सर्वांनाच हेल्मेटसक्ती असणार आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार नाही. कारवाईचे सक्त आदेशही जी. श्रीधर यांनी वाहतूक शाखेला दिले आहेत. पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही हेल्मेटसक्ती कितपत यशस्वी ठरते ? नागरिकांकडून याला कितपत सहकार्य मिळते ? अन् पोलीस किती प्रामाणिकपणे कारवाया करतील ? हे सोमवारनंतरच समजेल. नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे.रस्त्यांकडेही द्या लक्ष !केवळ हेल्मेटसक्ती करुन चालणार नाही, तर शहरासह जिल्हाभरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. रस्ते खराब असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्ते दुरुस्तीची मागणीही जोर धरु लागली आहे.विनापरवाना रिक्षांवरही कारवाईविना परवाना असणाºया तब्बल १५० रिक्षांवर शुक्रवारी कारवाई करण्यात आली. दोन रिक्षावर ‘स्क्रॅप’ची कारवाई केली जाणार आहे. रिक्षा चालकांनी परवाना काढून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घ्यावी, असे आवाहन पो. नि. सुरेश बुधवंत यांनी केले आहे.
अगोदर पोलिसांवर झाली कारवाई; सोमवारपासून सर्वत्र हेल्मेटसक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:09 IST
हेल्मेट सक्तीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या पोलीस अधिकारी - कर्मचाºयांवर कारवाई केली. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करुन सुरक्षितता बाळगावी तसेच सहकार्य बाळगावे असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
अगोदर पोलिसांवर झाली कारवाई; सोमवारपासून सर्वत्र हेल्मेटसक्ती
ठळक मुद्देसहकार्य करण्याचे जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन