शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:40 IST

कुंपणच शेत खातेय : महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीसह इतरांवर गुन्हे लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ...

कुंपणच शेत खातेय : महिला पोलीस कर्मचा-याच्या पतीसह इतरांवर गुन्हेलोकमत न्यूज नेटवर्कबीड : अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर बीड ग्रामीण पोलिसांनी गस्तीच्या दरम्यान पांगरबावडी येथे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पकडला. याप्रकरणी चालक व मालक यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना, पांगरबावडी परिसरातून एक हायवा टिप्पर (एमएच-१२ पीक्यू-५९२३) अवैधरित्या वाळू वाहतूक करत होता. पोलिसांनी टिप्पर थांबवून पावती व इतर कागदपत्राची माहिती मागितली तसेच चौकशी केली. मात्र, चालकाकडे पावती आढळून आली नाही. तसेच विनापरवाना साडेपाच ब्रास वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले.याप्रकरणी चालक शेख यासीन शेख खाजा व मालक रवी सर्जेराव गायकवाड, सुनिल खरवाडे, यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे, श्रीपती मस्के, पोशि.दिनेश ढाकणे यांनी केली.वाळू प्रकरण गाजत असताना पोलीस पतीचा अवैध धंदा होता सुरूबीड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केलेले टिप्पर हे एका पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला पोलीस पतीचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. याच कारणामुळे वाळू प्रकरण गाजत असताना तसेच रात्री परवानगी नसताना अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात होती. अशा प्रकारे अनेक दिवसांपासून अवैध वाहतूक केली जात होती.अशाच प्रकारे पोलीस, महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाºयाचे भागिदारीमध्ये वाळू वाहतूक करण्यासाठी टिप्पर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभागBeed policeबीड पोलीस