शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या गुन्ह्यात डॉक्टरने चुकविले आरोपीचे नाव; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 15:45 IST

दोनवेळेस परत आलेला मुद्देमाल तिसऱ्यांदा पाठविला आहे.

ठळक मुद्देदोनवेळा निघाल्या त्रुटी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून मुद्देमाल परत

बीड : जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरने हलगर्जीपणा करीत अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीचे नाव चुकविले आहे. एवढेच नव्हे तर पुन्हा रक्त नमुन्यातही चूक केल्यामुळे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने हा मुद्देमाल परत पाठविला आहे. दोनवेळेस परत आलेला मुद्देमाल तिसऱ्यांदा पाठविला आहे. डॉक्टरच्या चुकीमुळे गंभीर गुन्ह्यात पुरावे जमा करण्यात पोलिसांची धावपळ होत आहे. आज हा धक्कादायक प्रकार समोर आला.

महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीला २२ वर्षीय तरूणाने बीडमधून पळवून नेले होते. त्याचा शोध पुण्यात घेऊन त्याला बीडला परत आणले. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करून रक्त, केस, नखे व इतर आवश्यक वैद्यकीय पुरावे जप्त केले. डॉक्टरांमार्फत ते न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याच्या एका चुकीमुळे आरोपीचे नाव चुकले. त्यामुळे हा रिपोर्ट परत आला.

यात दुरूस्ती करून तो पुन्हा पाठविला. यामध्ये रक्ताचे दोन नमुने घेतल्याचे लिहिले. प्रत्यक्षात एकच नमुना घेतला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा हा अहवाल परत आला. आता मंगळवारी पुन्हा तपास अधिकाऱ्यांनी हा अहवाल पाठविला आहे. आता यामध्ये आणखी त्रुटी निघते की बरोबर समजला जातो, हे नंतरच कळणार आहे.

दोषारोप पत्र दाखल करण्यास विलंबवैद्यकीय पुरावे न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून वेळेवर न आल्यामुळे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यास विलंब होत आहे. यामध्ये पोलिसांची धावपळ होत असल्याचे दिसून येते. डॉक्टरांची एक चूक किती महागात पडते, याचे हे उदाहरण ठरले आहे. आणखी इतर गुन्ह्यांत पण अशीच परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. एमएलसी विभागातून पोलिसांना वेळेवर कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. इतरांच्या अडचणी सोडविणाऱ्या  पोलिसांना  मात्र स्वत:ला त्रास सहन करावा लागत असताना मूग गिळून गप्प रहावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

पोलीस अन् वैद्यकीय अधिकारी म्हणतात...दरम्यान, तपास अधिकारी पोउपनि बी.एस.ढगारे यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याला दुजोरा दिला आहे. तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर वैद्यकीय अधिकारी ए.ए.जाधव म्हणाले, हा प्रकार नजरचुकीने झाला आहे. फॉर्मवर दोन ठिकाणी नाव बरोबर आहे. नमुन्याबाबत टेक्निकल बाबी आहेत. कोणी मुद्दामहून असे करत नाही.

गंभीर बाब दोनवेळेस चुक झाली असेल तर गंभीर बाब आहे. याची चौकशी केली जाईल. यात डॉक्टरला नोटीस बजावून योग्य ती कारवाई केली जाईल. - सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक, बीड

चौकशी केली जाईल प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी केली जाईल. गंभीर गुन्ह्यात असे झाले असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल. कुठल्याच प्रकरणात हलगर्जीपणा होऊ नये.डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी