शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हातकडीसह पसार आरोपी बायकोला भेटायला निघाला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 11:47 IST

तब्बल अडीज महिन्यानंतर हातकडीसह पोलिसाच्या तावडीतून पळालेला आरोपीला बावी परिसरात दुचाकीसह जेरबंद 

- नितीन कांबळे कडा (बीड): अत्याचार प्रकरणात फरार असलेला आरोपी मोठ्या शिताफीने पडल्यानंतर पोलीस त्याला ठाण्यात घेऊन येत होते. यावेळी लघुशंकेसाठी पोलिसांची गाडी थांबताच आरोपी हातकडीसह पसार झाल्याची घटना ३० जून रोजी घडली होती. तब्बल अडीज महिन्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा  या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकास गायकवाड असे आरोपीचे नाव असून त्यास बावी परिसरातून ताब्यात घेतले. 

आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील २०१९ मध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेला आरोपी विकास कैलास गायकवाड हा अंभोरा पोलिसांना अनेक महिन्यांपासून  गुंगारा देत होता. दरम्यान, अंभोरा पोलिसांनी २९ जून रोजी विकासला एका ठिकाणावरून ताब्यात घेतले. ३० जून रोजी पोलिस गाडीतून बीडवरून अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपीला आणण्यात येत होता. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथे गाडी लघुशंकेसाठी थांबवली. यावेळी संधी साधत विकास  पोलिसांच्या हाताला झटका देत हातकडीसह पसार झाला. 

आरोपी पुढे, पोलिस मागे असा पाठलाग काही काळ चाला मात्र, विकास पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता. दरम्यान, आज विकास धामणगाव या  सासरवाडीच्या ठिकाणी पत्नीला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धामणगाव येथे दुचाकीवर जात असताना बावी परिसरातून पोलिसांनी पुन्हा एकदा विकासला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखीली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, आदिनाथ भडके,  अंमलदार कल्याण राठोड, अमोल शिरसाठ, शिवदास केदार, भागवत हवेले, सतिश पैठणे, यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड