शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये जिल्हा रूग्णालयाच्या छतावर आंबट चाळे करणाऱ्यांना अभय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 17:35 IST

पोलीस निरीक्षक म्हणतात, मला पत्र मिळालेच नाही

ठळक मुद्देरूग्णालय, पोलिसांचा समन्वय जुळेना 

बीड : जिल्हा रूग्णालयाच्या इमारतील आंबट चाळे करताना एका महिलेसह दोन पुरूषांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे पत्र रूग्णालय प्रशासनाने शहर पोलिसांना दिले. मात्र, येथील पोलीस निरीक्षकांकडून माझ्याकडे पत्र आलेच नाही, असे सांगितले. विशेष म्हणजे रूग्णालयाच्या पत्रावर शहर ठाण्यालापत्र मिळाल्याचा आवक शिक्का देखील आहे. केवळ समन्वय जुळत नसल्यानेच या तिघांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे.

धक्कादायक ! चक्क जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीवर ‘आंबट चाळे’

जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ च्या छतावर मद्यप्राशन करून आंबट चाळे करताना एका वॉर्ड बॉयने पाहिले. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रूग्णालयाची तक्रार आहे की नाही हे न विचारताच केवळ महिलेची तक्रार नाही, असे सांगून या तिघांनाही ‘लाख’ मोलाची मदत पोलिसांनी केली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी  पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. सुरक्षा रक्षकांना ठाण्यात पाठवून पत्रही दिले. मात्र, मंगळवारी काहीच कारवाई झाली नाही.

बुधवारी सकाळीच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसलीच कारवाई झालेली नव्हती. उलट मोरे यांनी आपल्याला रूग्णालयाचे पत्रच मिळाले नसल्याचे सांगितले. तर रूग्णालयाने पत्रावर शहर पोलीस ठाण्याचे रिसिव्हड दाखविली आहे. यावरून येथील निरीक्षकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

तर मनौधैर्य वाढेल..रूग्णालयाच्या इमारतीवर आणि रूग्णालयाच्याच मालकिचे साहित्य घेऊन आंबट चाळे करण्याची हिंमत त्या तिघांनी केली होती. त्यांच्यावर यावेळी कारवाई नाही झाली तर असे कृत्य करणाºयांचे मनोधैर्य वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

पोलिसांनी कारवाई करावी गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचारी व सुरक्षा रक्षक ठाण्यात गेले होते. त्यांनी जबाब घेतल्याचे सांगितले. पत्रही दिले असून त्याची रिसिव्हड आमच्याकडे आहे. छतावरील साहित्य जप्त करणार की आम्ही नष्ट करावे, याबाबतही आम्ही पत्र देत आहोत. उपअधीक्षकांशी बोलणे झाले आहे. पोलिसांनी संबंधितांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक

गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा रूग्णालयातील प्रकाराबद्दल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादी येताच गुन्हा दाखल केला जाईल.- विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक,बीड

अद्याप रुग्णालयाचे पत्र नाही माझ्याकडे रूग्णालयाचे कसलेच पत्र आलेले नाही. फिर्यादीला आम्ही बोलावून आणू शकत नाहीत. मी नुकताच पदभार स्विकारला आहे. - व्ही.बी.मोरे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस