शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फिर्यादी मठाधिपतींनाच आरोपी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:14 IST

तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू महाराजाने स्वत:च्या मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर मठाधिपतीशिवाय हे अघोरी कृत्य होऊ शकत नाही.

ठळक मुद्देकोळगाव येथील सूर्यमंदिरावरील समाधी प्रकरण । ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

गेवराई : तालुक्यातील सूर्यमंदिर संस्थानवर एका भोंदू महाराजाने स्वत:च्या मुलीच्या स्मरणार्थ जादूटोणा करत समाधी उभारल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर मठाधिपतीशिवाय हे अघोरी कृत्य होऊ शकत नाही. त्यामुळे मुख्य आरोपी मठाधिपतीच असल्याचा आरोप करत फिर्यादी मठाधिपती यांना आरोपी करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली.कोळगाव येथील सूर्र्यनारायण मंदिरासमोरच येथून जवळच असलेल्या साठेवाडी येथील सुरेश महाराज धोत्रे यांनी जादूटोणा करीत त्यांच्या मयत मुलीच्या स्मरणार्थ बांगड्या, केस, लिंबू, साडी, चोळी, चप्पल, हळद, कुंकू आदी साहित्य पुरुन त्यावर समाधी उभारली होती.दरम्यान शुक्रवारी ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडत समाधी उद्ध्वस्त केली. यावेळी तणाव निर्माण झाल्याचे समजल्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि विजय देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पोलिसांसमक्ष समाधी उकरुन त्याखालील जादूटोणा साहित्य काढले होते. पोलिसांनी ते साहित्य जप्त केले.या प्रकरणी संस्थानचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांच्या फिर्यादीवरून सुरेश महाराज धोत्रे यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मात्र या प्रकरणाने कलाटणी घेतली असून या प्रकारात मठाधिपती हनुमान गिरी यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. पुढे कोणती कार्यवाही होते, याकडे लक्ष लागले आहे.तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारासूर्यमंदिर संस्थान भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र हनुमान महाराज गिरी हे मठावर अघोरी कृत्य करुन भाविकांच्या भावनांशी खेळत आहेत. हे कृत्य हे मठाधिपतींच्या परवानगीशिवाय शक्य नाही, यामध्ये त्यांचाच हात असून ते मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ चौकशी करुन मठाधिपतींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, नसता ग्रामस्थांच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अ‍ॅड .उध्दव रासकर यांनी दिला आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी