बीड : विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी बीड जिल्ह्यात आढावा घेतला, त्यावेळी फरार आरोपींची संख्या जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी पाहिजे फरार आरोपी पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत १७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ५ वर्षांपासून फरार असलेल्या ७ आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचा टक्का मागील काही काळात वाढलेला आहे. दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आढावा बैठकीत त्यांनी फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी पाहिजे फरार आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व प्रत्येक पोलीस ठाण्यास देखील उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारवाई करत १७८ आरोपींना अटक केली आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. या मोहिमेमुळे पीडितांना तत्काळ न्याय मिळेल, हा उद्देश पोलीस प्रशासनाचा होता. तर, मागील पाच वर्षांपासून अधिक काळ काही गुन्ह्यातील आरोपी फरार होते. त्यापैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे आरोपीचे नाव
युसूफ वडगाव पिन्या बाबू भोसले
लतवाडा नवनाथ राम माळी
शिरूर कासार शेख सिकंदर शेख महंमद
गेवराई दीपक गौतम पवार
शिवाजीनगर बीड विपूल उत्तम गायकवाड
बीड ग्रामीण संजय बांडुरंग बहीर
पेठ बीड राजेंद्र रामभाऊ गायकवाड
आरोपी दिसल्यास पोलिसांना माहिती द्या
पाहिजे व फरार असलेल्या आरोपींच्या नावाची यादी पोलीस ठाण्यासमोर लावण्यात आली आहे. त्या आरोपींची माहिती कोणाला मिळाली, तर त्यांनी ती माहिती संबंधित पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षातील ०२४४२-२२२६६६ व ०२४४२-२२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.