शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

ऐन दिवाळीत काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ऐन दिवाळीत तीन अपघातात पाच जण ठार झाले तर बीडमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा संशयास्पद ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐन दिवाळीत तीन अपघातात पाच जण ठार झाले तर बीडमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. गुढी पाडवा व भाऊबिजेच्या दिवशी या घटना घडल्या.‘शिवशाही’च्या धडकेततरुणाचा मृत्यूगेवराई : दिवाळी सणासाठी दुचाकीवरून स्वत:च्या गावाकडे निघालेल्या तरुणाचा भरधाव शिवशाही बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री बीड - गेवराई रोडवर पाडळसिंगी येथे झाला. केशव बाबासाहेब नागरे (वय ३३, रा. वाघलखेडा ता. अंबड, जि. जालना) असे मयत तरुणाचे नाव आहे. बारामती येथे एका कंपनीत कामाला असणारे केशव नागरे हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून (एमएच २१ एएम ८६५८) दिवाळी सणासाठी स्वत:च्या गावाकडे निघाले होते.रात्री १० वाजता बीड - गेवराई मार्गावर पाडळसिंगी जवळ सोमाणी जिनिंगसमोर आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू १३१८) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात केशव नागरे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सततच्या अपघातांमुळे शिवशाही बससेवा वादाच्या भोव-यात सापडली आहे.साखरेच्या ट्रकखाली दबून चौघे ठारलोकमत न्यूज नेटवर्कगंगामसला : माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती कारखान्यातून साखरेची पोती घेऊन परभणीकडे जाणार ट्रक पलटी झाला. त्यामुळे साखरेच्या पोत्याखाली दबून दयानंद गणेश सोळंके (४०) संगीता दयानंद सोळंके (३६) राजनंदिनी दयानंद सोळंके (७) पृथ्वीराज दयानंद सोळंके (५) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरापासून ३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावरील एच.पी. गोडावून जवळ घडली. या प्रकरणी चालक रुपेश फिरताराम यादवला ट्रकसह तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.सोळंके कुटुंब माजलगाव शहरात राहत होते. पाडव्यानिमित्त ते गंगामसला येथील मोरेश्वराचे दर्शन घेऊन माजलगावला येत होते. शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर एच.पी. गॅस गुडवून जवळ आले असता समोरून साखरेचे पोते घेऊन येणा-या ट्रक चालकाने कट मारला. यामुळे ट्रक (सी.जि.०८ए.सी./३३४१) पलटी झाला. याच ट्रकखाली सोळंके कुटूंब सापडले आणि चौघांचा पोत्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. तर इर्शाद उर्फ बाबु हे या अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील संत नामदेव नगर भागात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दाम्पत्यासह त्यांच्या चिमुकल्या मुलीचा यामध्ये समावेश आहे. पतीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असले तरी पत्नी व मुलीच्या मृत्यूचे गुढ कायम असून पोलिसांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. तपासानंतर याचे गुढ उलगडणार असून याप्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.गणेश शिंदे (२६), शितल (२३) व श्रावणी (४) अशी मयतांची नावे आहेत. गणेश शिंदे हे आई-वडील, पत्नी व मुलीसह संत नामदेव नगर भागात वास्तव्यास आहेत. बीडमध्ये ते काम करायचे. पाडव्याच्या दिवशी सर्व कुटूंब जेवण करून आपापल्या खोलीत झोपले. सकाळी गणेश यांचे वडील सुर्यभान शिंदे हे उठले. बाजुलाच असलेल्या शेवग्याच्या झाडाजवळ त्यांना गणेश उभा असल्याचे दिसले. जवळ जावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी घरात धाव घेत सुन शितलला आवाज दिला. मात्र घरातून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. आत जावून पाहिले असता शितल व नात श्रावणी हे दोघेही पलंगावर मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ परिसरातील लोकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. येथे शवविच्छेदन झाले. गणेशने आत्महत्या केल्याचे स्पष्ट असून शितल व श्रावणीचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू