शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

वाटसरूला लिफ्ट दिली, पण जीवनप्रवास अर्ध्यातच संपला; टँकरच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 17:55 IST

बीड-नगर राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघे जागीच ठार, आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील घटना

- नितीन कांबळे

 कडा- कडा येथील काम आवरून संकुडवाडी कडे निघालेल्या दुचाकीचालकाला एकाने लिफ्ट मागितली. मात्र काही अंतरावर जाताच बीड-नगर राज्य महामार्गावरील डोईठाण येथील शिवनेरी चौकात टँकरच्या धडकेत दोघांचाही जायचं मृत्यू झाला. हा अपघात दुपारी चार वाजता असून मृत दोघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. 

पाटोदा  तालुक्यातील संकुडवाडी  येथील दुचाकी चालक  रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून धामणगांव मार्ग गावाकडे जात होता. धामणगाव येथे रोडवर उभा असलेल्या एकाने लिप्ट मागितल्याने त्याला घेऊन तो पुढे निघाला. मात्र काही अंतरावर जाताच बीड नगर राज्य महामार्गावरील डोईठाण परिसरातील शिवनेरी चौकात बीडहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या टँकरसोबत ( क्रमांक एम.एच १६,सी.सी.७६३१) दुचाकीची जोराची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच टँकर चालक पसार झाला होता. कडा पोलिसांनी पाठलाग करत चालकाला टँकरसह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी  आष्टी पोलिस देखील तात्काळ दाखल झाले होते. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात रवाना करून वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात