शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये धुक्यामुळे अपघात; महाराष्ट्रातील ट्रक चालक अन् क्लिनरचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:27 IST

धुक्यामुळे नादुरुस्त ट्रकवर दुसरी ट्रक धडकली; छत्तीसगडमध्ये बीड,अहिल्यानगरमधील दोघांचा मृत्यू

- नितीन कांबळेकडा- छत्तीसगड येथील मुंबई-कोलकत्ता मार्गावर ब्रेक निकामी झाल्याने रस्त्यात उभा एक ट्रक पहाटेच्या धुक्यात न दिसल्याने महाराष्ट्रातून गेलेला दूसरा ट्रक त्यावर पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला. यात बीड आणि अहिल्यानगर येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात सोमवारी पहाटे झाला. 

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गहुखेल येथील गणेश नवनाथ दहिफळे ( ३०) यांचा स्वतःचा मालवाहतूक ट्रक ( क्रमांक M.H. २३,W.१९६१) आहे. १८ जानेवारी रोजी ते अहिल्यानगर येथून कांदा गोण्या ओडिशा  राज्यातील बाजारपेठेत घेऊन जात होते. सोमवारी छत्तीसगड येथील महासमुंद जिल्ह्यात ते पोहचले होते. पहाटे पटेवा गावाच्या हद्दीतील मुंबई-कोलकत्ता मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू होता. दरम्यान, याच रस्त्यावर ब्रेक निकामी झाल्याने उभा नादुरुस्त ट्रक धुक्यामुळे न दिसल्याने दहिफळे यांचा ट्रक त्यावर जोरात धडकला. 

या भीषण अपघातात ट्रकच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यात गहुखेल येथील गणेश नवनाथ दहिफळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील सहकारी नितीन राठोड ( १८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी अंत्यत शोकाकुल वातावरणात गणेश दहिफळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात