शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अपघातवार ! बीड जिल्ह्यात चार अपघातात पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 8:30 PM

जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़

बीड : जिल्ह्यात आज चार वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार झाले़. आडस- अंबाजोगाई रस्त्यावर कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला.़ वडवणी तालुक्यात टिप्परच्या धडकेत बियाणे खरेदीसाठी निघालेले दुचाकीवरील दोन शेतकरी ठार झाले़  गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला़ तर लोखंडीसावरगावजवळ दुचाकी घसरून पडल्याने एक जण जागीच ठार झाला. यामुळे जिल्ह्यात शुक्रवार अपघातवार ठरला.

अमेर अन्वर शेख (३०, रा. भालदारपुरा बीड) हे दुचाकीवरुन (क्ऱएमएच २३ एके- ७९७६) पत्नी व भावाच्या अडीच वर्षांच्या मुलासमवेत बीडहून अंबडकडे जात होते. पाडळसिंगीजवळ समोरुन आलेल्या भरधाव ट्रकने (जीजे०१ सीझेड- ५६०१) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे आमेर व दुचाकीवरी पत्नी व पुतण्या रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यात जखमी होऊन आमेर यांचा मृत्यू झाला तर पत्नी व पुतण्या गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, दुचाकीला धडक दिल्यानंतर लगेच ट्रकने दुचाकीमागे असलेल्या कारलाही (क्ऱएमएच ०३ बीसी- ०७८२) समोरुन धडक दिली़ कारमधील शेख युसूफ शेख युनूस, सय्यद मंजूर मनोद्दीनजमीर, शेख जमीर शेख बाबमियां, शेख सादेक सिकंदर (सर्व रा. मासूम कॉलनी बीड ) हे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारनंतर काही गंभीर रुग्णांना औरंगाबाद येथे हलिवण्यात आले आहे. अपघातानंतर गेवराई ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली़ तोपर्यंत नागरिकांनी ट्रकचालक प्रताप ठाकूर याला पकडले़ त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले़ अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात जखमी व मृताच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.

दुसऱ्या घटनेत ताडसोन्ना येथून वडवणीकडे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिप्परने जोराची धडक दिली़  या अपघातात दुचाकीवरील केशव लंबाटे (४५), कुंडलीक मुंडे (३५ दोघे रा. ताडसोन्ना) हे दोन शेतकरी जागीच ठार झाले. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घाटसावळी जवळील पोखरी फाट्यावर ही घटना घडली. ते पेरणीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी मित्राची दुचाकी (क्र.एमएच २३ एम-५१४१) घेऊन वडवणीला निघाले होते. मात्र पोखरी फाट्यावर टिप्परने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातानंतर टिप्परसह चालक फरार झाला असून पिंपळनेर पोलीस त्याचा शोध घेत आहेत़

आडस येथील किराणा मालाचे व्यापारी विष्णू सदाशिव कोटे हे अंबाजोगाई येथून दुचाकीवरुन (एमएच ४४ एल- २३८२) आडस येथे येत होते. आडस येथून अंबाजोगाईकडे जाणारी कार (क्र. एमएच २४ एल -००१७) या दोन्ही वाहनांची केंद्रेवाडी शिवारात  समोरासमोर धडक झाली. कारच्या खाली अडकून दुचाकी ५० फूट फरफटत गेली़  यामध्ये विष्णू कोटे यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. कारमधील दोघे जखमी असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गाडीवरून पडून एकाचा मृत्यूमध्यरात्रीच्या वेळी लोखंडी सावरगावहून सोमनाथ बोरगावकडे निघालेल्या उमेश बबन सोमवंशी (वय ३२, रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई) यांचा मोटारसायकल घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना अंकुर प्रतिष्ठानजवळ घडली. पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्यावरून त्यांची दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला पडल्याने पहाटेपर्यंत त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना पाहिले.  पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड