शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

एसीबीचे अधिकारीच अडकले ट्रॅपमध्ये; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 18:17 IST

ACB officials trapped in trap ‘लोकमत’ने केली होती बातमी : महासंचालक व अधीक्षकांच्या चौकशीनंतर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देबीडच्या एसीबीने एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना पकडले होते. या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी एसीबीचा तत्कालीन पीआय राजकुमार पाडवी आणि रायटर प्रदीप वीर याने ५० हजारांत तडजोड केली होती.

बीड : एसीबीमध्ये कार्यरत असताना सापळ्यात अडकलेल्या एका शाखा अभियंत्याला लाच मागितल्याच्या प्रकरणात बीड एसीबीचा तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी याच्यासह त्याचा तत्कालीन रायटर प्रदीप वीर या दोघांनी लाचेची मागणी केली. याची तक्रार एसीबीचे पोलीस महासंचालक व औरंगाबाद परिक्षेत्र विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात राजकुमार पाडवी व प्रदीप वीर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

बीडच्या एसीबीने एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना पकडले होते. या प्रकरणात आरोपी शाखा अभियंता शेख समद नुर मोहम्मद याला मदत करण्यासाठी एसीबीचा तत्कालीन पीआय राजकुमार पाडवी याने दोन लाखांची लाच मागितली आणि त्यानंतर त्याचा रायटर प्रदीप वीर याने ५० हजारांत तडजोड केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली होती. शेख समद याचा भाऊ जमिलोद्दीन शेख यांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीवर एसीबीच्या महासंचालक कार्यालयाने चौकशी केली. या चौकशीत लाचेची मागणी केल्याचे समोर आल्यानंतर सोमवार रोजी रात्री उशिरा एसीबी औरंगाबादचे पथक बीड शहरात दाखल झाले. या पथकाने राजकुमार पाडवी आणि प्रदीप वीर याच्या विरोधातील बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एसीबीचे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस हवलदार राजेंद्र जोशी, मिलिंद इप्पर यांनी केली. राजकुमार पाडावी याची काही दिवसांपूर्वी बीडहून औरंगाबादला बदली झाली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच त्याची मुंबई येथे बदली झाली आहे, तर प्रदीप वीर याला यापूर्वीच एसीबीमधून जिल्हा पोलिसात परत पाठविण्यात आले आहे.

‘लोकमत’ने केले होते वृत्त प्रकाशित‘बीडच्या लाचलुचपत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच मागितली लाखाची लाच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ६ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याच प्रकरणात तलाठी दादासाहेब आंधळे यांनी देखील तक्रार केली होती, तर, त्यांना २४० रुपये शासकीय शुल्क आकारलेले असताना देखील, एसीबीची कारवाई करण्याची धमकी देत १ लाखाची लाच मागितली होती. याची तक्रार सुरुवातीला बीड एसीबीकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे २९ एप्रिल २०२१ रोजी तक्रार करण्यात आली होती. तसेच शाखा अभियंत्याने देखील पुराव्यासह तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

‘एसीबी’चा लावला ट्रॅपशाखा अभियंत्यावर २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर बचावासाठी २ लाखांची मागणी केली होती. मात्र, त्यासंदर्भातील सर्व ऑडिओ क्लिप तक्रारीसोबत सादर करण्यात आली होती. त्याआधारे दीड महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी चौकशी केली, त्यात हे दोघेही दोषी आढळून आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबादBeedबीडCrime Newsगुन्हेगारी