शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अपमानास्पद वागणूक; ग्रामसेवकांचा बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:30 IST

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत, ग्रासेवकांनी गुरुवारी बैठकीवर बहिष्कार घालत व सभात्याग केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे यांनी अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत, ग्रासेवकांनी गुरुवारी बैठकीवर बहिष्कार घालत व सभात्याग केला. तसेच डॉ.भोकरे यांना पदावरुन हटवण्याची मागणी करत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने निवेदन दिले आहे.गुरुवारी येथील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात विविध कामांसंदर्भात तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक होती. यावेळी पं.स. बीडीओ शिनगारे, विस्तार अधिकारी मोरे उपस्थित होते. बैठकीत डॉ.भोकरे यांनी ग्रामसेवकांना कामांविषयी विचारणा केली. ग्रामसेवक त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असताना काहीही न ऐकता निलंबित करण्याची तंबी दिली. त्यामुळे ग्रामसेवकांनी बैठकीवर बहिष्कार घालत पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. ग्रामपंचायतचे नियमित कामकाज, दुष्काळ निवारण, पाणी टंचाई ही कामे वगळून तपासणीसाठी दप्तर उपलब्ध न करणे, कोणतेही अहवाल न देणे अशा प्रकारे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. भोकरे यांना तात्काळ बदलण्याची मागणी करत यासाठी जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचे तालुकाध्यक्ष सखाराम काशीद यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, भगवान तिडके, दत्ता नागरे, मधुकर शेळके, बाळासाहेब घुले, बी.एस.काटे, बाबूराव ननवरे, नारायण बडे, भाऊसाहेब मिसाळ, बी.ए.चव्हाणसह इतर ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.काम असमाधानकारक असताना आंदोलन योग्य नाही : डॉ. भोकरेनरेगामधील कामाचा वार्षिक आराखडा अद्याप पंचायत समितीला सादर केला नाही. दुष्काळी परिस्थिती व करावयाच्या उपाययोजना व उर्वरित इतर कामे यासंदर्भात सूचना करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र काम असमाधानकारक असताना देखील आंदोलनाचा पवित्रा घेणे योग्य नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनील भोकरे म्हणाले. शासना मार्फत सबकी योजना सबका विकास या मोहिमेंतर्गत महाराष्ट्रातील ४१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे वेळापत्रक आॅनलाईन करणे बाकी आहे. त्यात बीड पंचायत समिती अंतर्गत असलेल्या २० ग्रामपंचायत आहेत. ते काम पूर्ण करणे अपेक्षित होते.१४ व्या वित्त आयोगामधून गावाला प्राप्त निधी, त्यातून केलेली कामे हे गावकऱ्यांना माहित व्हावे म्हणून प्राप्त निधी व खर्च दर्शवणारा माहिती फलक ग्रामपंचायतला लावणे आवश्यक आहे. परंतु बीड तालुक्यातील केवळ १० ग्रामपंचायतींनी असे फलक लावल्याचे डॉ. भोकरे म्हणाले.

टॅग्स :Beedबीडpanchayat samitiपंचायत समिती