शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

मुल अदलाबदल प्रकरणातील दोषींना अभय, कारवाई करण्यास ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 9:11 AM

११ मे रोजी छाया राजू थिटे (रा. हिंगोली ह. मु. कुप्पा, ता. वडवणी) या महिलेने मुलीला जन्म दिला होता.

बीड : राज्यभर गाजलेल्या जिल्हा रूग्णालयातील मुल अदलाबदल प्रकरणात दोषी परिचारीकांवर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. जिल्हा रूग्णालय प्रशासनाने कारवाईचा प्रस्ताव पाठविल्यानंतरही लातुरच्या आरोग्य उपसंचालकांकडून या प्रकरणाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्याकडूून या कर्मचाºयांना अभय दिली जात असल्याची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे. 

११ मे रोजी छाया राजू थिटे (रा. हिंगोली ह. मु. कुप्पा, ता. वडवणी) या महिलेने मुलीला जन्म दिला होता. परंतु रुग्णालयातील शुभांगी नाईकवाडे, सपना राठोड, संगीता बनकर, सुनिता पवार या चार परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीऐवजी मुलाची नोंद झाली. हा सर्व प्रकार २१ मे रोजी समोर आला. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतिष हरीदास यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी सर्वांचे जबाब घेतले. डॉ.थोरात यांनी यापूर्वीच डॉ. परमेश्वर बडे, डॉ. अनिल खुलताबादकर यांना कार्यमुक्त केले होते. व परिचारीकांवर कारवाईसाठी आरोग्य उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविला होता. 

दरम्यान, प्रस्ताव पाठवुन दीड महिना उलटला तरी अद्याप यावर कसलीच कारवाई झालेली नाही. आरोग्य उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे यांना संपर्क केल्यानंतर कारवाई प्रस्तावित आहे, असे सांगून या प्रकरणाला बगल दिली जात आहे. त्यामुळे आता या  प्रकरणात आरोग्य उपसंचालकांकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे.

अधिवेशनात प्रश्न उपस्थित मुल अदलाबदल प्रकरणाचा प्रश्न अधिवेशनातही तारांकीत करण्यात आल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. यावर बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती सुद्धा मागविली होती. त्यांनी यामध्ये नेमकी काय माहिती दिली, हे मात्र समजू शकले नाही. 

कारवाई टाळाटाळ

सूत्रांच्या माहितीनूसार डॉ.बोरसे यांना जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात भेटले आहेत. कारवाईची विचारपूसही केल्याचे सांगण्यात आले. परंतु बोरसे यांच्याकडून अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. या सर्व परिस्थितीवरून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते. आमच्या हातातील कारवाई पूर्ण केली आहे. परिचारीकांवरील कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तेच पुढील कारवाई करतील. कारवाईसंदर्भात बोललो देखील आहे. लवकरच निर्णय येईल.डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्यचिकित्सक, बीड कारवाईसाठी प्रस्ताव आला आहे. त्यावर टिप्पणी ठेवली आहे. कारवाई व्हायला हरकत नाही. होईल कारवाई लवकरच.डॉ.हेमंत बोरसेआरोग्य उपसंचालक, लातूर