शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

परळीत पोस्टऑफिसमधून 'आधार'चे साहित्य लंपास; कुलूप न तुटल्याने ट्रेझरीतील रक्कम वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:50 IST

पोस्ट कार्यालयात सीसीटीव्ही व रात्रपाळी सुरक्षा कर्मचारी नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे. 

- संजय खाकरेपरळी ( बीड ) : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर जवळी पोस्ट ऑफिसच चोरट्यांनी  फोडण्याचा प्रकार शनिवारी रात्री नंतर घडला आहे. अज्ञात चोरट्यनी पोस्ट ऑफिस मधील आधार सेंटरचे सर्वच साहित्य चोरून नेले आहे. तसेच ट्रेझरी रूमचेही कुलूप तोडून ट्रेझरी फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या चोरी प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट कार्यालयात सीसीटीव्ही व रात्रपाळी सुरक्षा कर्मचारी नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे. 

परळीत पहिल्यांदाच पोस्टात चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. परळीचे पोस्ट मास्तर चंद्रकांत हरदास यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली आहे. पोस्ट कार्यालयातील मुख्य दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून चोरटे आत घुसले. आतील आधार सेंटर मधील संगणक, की बोर्ड ,फिंगरप्रिंट स्कॅनर ,आय स्कॅनर चोरट्यांनी पळून नेले आहे. तसेच शेजारीच असलेल्या ट्रेझरी रूमचेही चोरट्याने कुलूप तोडले. आतील तिजोरीचे कुलप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रेझरीचे कुलूप काही चोरट्यांना निघू शकले नाही ट्रेझरी मध्ये रोख रक्कम होती परंतु त्याच्या हाती लागू शकली नाही. चोरीस गेलेल्या एकूण साहित्याची किंमत 65 हजार रुपये असल्याची माहिती पोस्टमास्तर चंद्रकांत हरदास यांनी पोलिसांना दिली आहे. चोरीचा हा प्रकार शनिवारी रात्री नंतर घडला. सोमवारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व इतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. या प्रकरणाचा तपास संभाजी नगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आईटवार करीत आहे.

आधार सेंटर चे सर्वच साहित्य चोरीला गेल्याने सोमवारी आधार नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. नाव बदलण्यासाठी संगमहून आलो होतो परंतु काम काही झाले नाही असे संगमचे ग्रामस्थ कुंडलिक दराडे यांनी सांगितले.

बीड येथील वरिष्ठांकडे येथील पोस्टात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. - चंद्रकांत हरदास, पोस्टमास्तर 

परळीच्या पोस्ट कार्यालयात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात येईल .सीसीटीव्ही फुटेज द्वारे तपास सुरू करण्यात आला आहे. - धनंजय ढोने, पोलीस निरीक्षक

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी