शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

अंधारात उभ्या ट्रकवर धडकली दुचाकी, तरुणाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 18:04 IST

गाडी उभी केल्यानंतर ट्रकचे इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट चालकाने सुरु नव्हती ठेवली.

नांदेड: रस्त्यात उभ्या ट्रकवर दुचाकी धडकून एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री नांदेड ते उस्माननगर रस्त्यावरील बाभुळगाव पाटीजवळ घडली.बाबूराव भगवान गजभारे असे मृताचे नाव आहे.  ट्रकची पाठीमागील पार्किंग लाईट सुरु नव्हती यामुळे दुचाकीस्वारास अंधारात अंदाज न आल्याने अपघात झाल्याची शक्यता आहे.

नांदेडच्या सिडको वसाहती शेजारील गोपाळचावडी येथील बाबूराव भगवान गजभारे रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून (एमएच-२६, ई- ६६२०)  नांदेड ते उस्माननगर प्रवास करत होता. बाभुळगाव पाटीजवळ एक ट्रक ( एमएच-१४, सीपी-७५९९) उभा होता. मात्र, ट्रकचे इंडिकेटर किंवा पार्किंग लाईट चालकाने सुरु नव्हती ठेवली. यामुळे पाठीमागून येणाऱ्या बाबुरावला अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी ट्रकवर धडकली. यात बाबूरावला डोक्यास जबर मार लागला. नातेवाईकांनी  अधिक उपचाराकरिता विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासून बाबुरावला मृत घोषित केल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी व मदतनीस महिला अंमलदार अश्विनी मस्के यांनी दिली. याप्रकरणी रामदास भगवान गजभारे (रा. गोपाळचावडी ता.जि. नांदेड) ने दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व पोलीस अंमलदार भगवान गिते हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, १२ डिसेंबर रोजी सकाळी गोपाळचावडी येथील स्मशानभूमीत बाबूराव गजभारे यांच्या पार्थिव देहावर  शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड