शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

तिन्ही दरोडेखोरांची कसून चौकशी; अंमळनेर, आष्टी हद्दीतील दरोड्याचा उलगडा होण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:54 IST

आष्टी पोलिसांकडून दरोडेखोरांची कसून चौकशी सुरू आहे, इतर साथीदार आणि आधीच्या दरोड्याच्या घटना याबाबत माहिती मिळण्याची शक्यता

- नितीन कांबळेकडा: अंमळनेर,आष्टी पोलिस ठाणे हद्दीत एकाच दिवशी दोन दरोड्याच्या घटना घडल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा ॲक्शन मोडवर आली होती. पण कसलाच सुगावा लागत नव्हता. मात्र, एका ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न फसल्यानंतर आल्या पावली परत निघालेल्या तीन दरोडेखोरांना ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दरोडेखोरांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून दोन दरोड्याच्या घटनांचे धागेदोरे लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आष्टी तालुक्यातील किन्ही येथील काकडेवस्तीवर २१ जुलै रोजी पहाटे दीडवाजेच्या सुमारास बंद घराच्या दरवाज्याचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत बाप लेकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवून ८८ हजार रुपयाच्या सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. याचा तपास सुरू असतानाच केरूळ येथील भागवत वस्तीवर ३० जुलै रोजी पहाटे दीड वाजेच्या दरम्यान अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी बाहेर झोपलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले. आरडाओरड ऐकून घरात झोपलेल्या राजू भागवत बाहेर येताच त्याच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करत पावणेदोन लाख रूपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. दोन्ही प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी पोलीस दरोडेखोरांच्या मागावर होते.पण कसलाच मागमूस लागत नव्हता. 

दरम्यान, शुक्रवारी (दि.१६) पहाटेच्या दरम्यान चोभानिमगांव येथील सतीश झगडे यांच्या घरी दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, प्रसंगावधान राखून झगडे यांनी हवेत गोळीबार केल्याने आल्या पावली माघारी फिरत दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले. मात्र, यातील तिघांना गस्तीवरील ग्रामस्थांनी पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले. या तिघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून अंमळनेर, आष्टी येथील दरोड्याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी