शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

अनेकांना पडलेला प्रश्न; व्यसन नसतानाही का होतो आतड्याचा कॅन्सर, जाणून घ्या कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:47 IST

बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अधिक सेवन, व्यसन, व्यायामाचा अभाव व ताणतणावामुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई : चरबीयुक्त आहार, गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारूच्या व्यसनामुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. शिवाय कोणतेही व्यसन नसताना दीर्घ कालावधीच्या ॲसिडीटीमुळेही हा आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. विशेष म्हणजे, या कॅन्सरमध्ये अन्ननलिका दोन ते तीन सेंटीमीटरपर्यंत अरुंद झाली, तरी विशेष असा त्रास जाणवत नाही. याकडे दुर्लक्ष होऊन तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातच या आजाराचे निदान होते. साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे वेळीच काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब :- बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्याच्या सवयी, जंक फूडचे अधिक सेवन, व्यसन, व्यायामाचा अभाव व ताणतणावामुळे आतड्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.- विशेषतः साखर आणि मांसाहार अमर्यादित होत असल्याने पस्तिशीतल्या तरुणांचे आतडे खराब होत असल्याचे दिसून येत आहे.- भारतात मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागातला म्हणजे गुदद्वाराचा कॅन्सर तरुणांमध्ये सर्वाधिक आढळून येतो.

कॅन्सरचे प्रकार किती?दोनशेहून अधिक प्रकारचे कॅन्सर आहेत. मुख्यत्वे आढळणारे गर्भाशय, स्तन, अन्ननलिका, मूख, अडजिभेचा, रक्ताचा कॅन्सर आहेत.

आतड्याचा कॅन्सर झाला कसे ओळखणार?पचनामध्ये समस्या असल्यास, जसे की वारंवार बद्धकोष्ठता किंवा वारंवार मलविसर्जन, मलमध्ये रक्त असल्यास किंवा त्याचा रंग काळा असल्यास, वारंवार पोटात दुखणे. वजन कमी होणे. थकवा जाणवणे. अती दारू पिल्याचा असाही परिणाम, अती दारू पिणं हे आतड्याच्या कॅन्सरचं एक मोठं कारण आहे. दारूमुळे आतड्यांमध्ये जळजळ होते आणि पेशींची वाढ अनियंत्रित होते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

आनुवंशिकता हेही कारण :ज्यांना कोणतंही व्यसन नसतं, त्यांनाही आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. याचं कारण म्हणजे आनुवंशिकता, पर्यावरणीय घटक आणि जीवनशैलीतील बदल.

भारतात ४० ते ५० वयोगटात ‘रेक्टम’, म्हणजे गुदाशयात होणारा कर्करोग हा सर्वांत सामान्य आहे. या शिवाय, ५० ते ६० वयोगटात कोलन कॅन्सर हा मोठ्या आतड्यात होणारा कर्करोग दिसून येतो. याला कोलोरेक्टल कर्करोग असेही म्हणतात. कोलन कॅन्सर हा जीवघेणा आजार आहे. पॉलीपोसिस कॅन्सर हा दुर्मीळ असला, तरी यामागे आनुवंशिकतेसह इतरही काही कारणे असतात.- डॉ. नितीन चाटे, सर्जरी विभाग प्रमुख, स्वा. रा. ती. रुग्णालय,अंबाजोगाई.

टॅग्स :Beedबीडcancerकर्करोगHealthआरोग्य