शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने हुल दिल्याने खाजगी बस खड्ड्यात कोसळली; नशीब बलवत्तर म्हणून वाचले ४० प्रवाशांचे प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 12:15 IST

सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून ट्रॅव्हल्समधील सर्व ४० प्रवासी सुरक्षित आहेत.

- नितीन कांबळेकडा (बीड) : शुक्रवारी रात्री पुण्याहून नांदेडला निघालेल्या माऊली ट्रॅव्हल्सच्या बसला बीडवरून अहमदनगरकडे जाणार्‍या एका ट्रकने हुल दिली. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून खड्ड्यात कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून बसमधील ४० प्रवाशांचा जीव वाचला. हा अपघात बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे आज पहाटे एक वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, माऊली ट्रॅव्हल्सची एक बस ( एम.एच क्रमांक २२.३८६७ ) पुण्याहून ४० प्रवाशांना घेऊन घेऊन बीडमार्ग नांदेडला जात होती. तर बीडहून अहमदनगरकडे एक ट्रक सुसाट वेगात जात होता. पहाटे १ वाजेच्या सुमारास बीड- धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील सांगवी(पाटण)येथे ट्रकने हुल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रोडलगत असलेल्या खड्ड्यात गेली.

सुदैवाने या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून ट्रॅव्हल्समधील सर्व ४० प्रवासी सुरक्षित आहेत.दरम्यान, अपघात झाल्यानंतर पहाटेच पर्यायी व्यवस्था करत प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघात