शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 20:48 IST

अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगावजवळ पुन्हा झाला अपघात

अंबाजोगाई - लोखंडी सावरगाव जवळील भरधाव वेगातील बसने दुचाकीला समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. संजय अंकुश डहाणे (वय ५०, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोदरी येथील संजय डहाणे, रवींद्र दगडू जाधव (वय ५३) आणि बालासाहेब शेषेराव कदम (वय ४७) हे तिघेजण अंबाजोगाईहून दुपारी गावाकडे दुचाकीवरून (एमएच ४४ एन ४३५२) निघाले होते. ते लोखंडी सावरगावच्या पेट्रोल पंपाच्या पुढे आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या औरंगाबाद - अंबाजोगाई एसटी बसने (एमएच २० बीएल ०५१४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचार सुरु असताना संजय यांचा मृत्यू झाला. तर, उर्वरित दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणादरम्यान, महामार्गाच्या कंत्राटदाराने या रस्त्यावरील काही जागावरील काम विनाकारण अपूर्ण सोडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. चार दिवसापूर्वीच या ठिकाणी फोर्म्युनर आणि रिक्षाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू