शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

१० महिन्यांत दाम दुप्पटचा फंडा; ५४ लाखांची फसवणूक; रिद्धीसिद्धी फायनान्सने गाशा गुंडाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 14:20 IST

या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातीलच गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे.

अंबाजोगाई : सुरुवातीला काही लोकांना गुंतवणुक केल्यास १० महिन्यात पैसे डबल होण्याची स्कीम सांगितली. त्यानंतर त्यांना ठरल्याप्रमाणे परतावाही दिला. यावर विश्वास बसल्याने  परतावा मिळालेल्या गुंतवणुकदारांनी स्वतः मित्र, नातेवाईक आदींना स्कीमबद्दल माहिती दिली. कुठलीही जाहिरात न करता दहा वीस गुंतवणुकदारांचा आकडा काही काळातच चारशे ते पाचशेवर जावून पोहचला. लाखों रुपये जमा झाल्यानंतर रिद्धीसिद्धी फायनान्स कंपनीने आपला गाशा गुंडाळत सर्वांनाच मोठा झटका दिला. आज-उद्या पैसे मिळतील या अपेक्षेने गुंतवणुकदारांनी वाट पाहिली मात्र फसवणुकच झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी रिद्धी सिद्धीच्या सर्व संचालकांवर अंबाजोगाई शहर पोलीसात गुरुवारी ५३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कांचन राहुल वाघमारे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रामेश्वर ओंकार कुरुळे (रा.लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई) यांनी शॉपवर सतत येवून ओळख केली. त्यानंतर रिध्दी सिध्दी फायनानशियल सर्व्हिसेसचा व्यवसाय आहे. यामध्ये माझे साथीदार प्रभाकर श्रीकृष्ण हजारे, नम्रता खरात मिळून ट्रेडींग, पोल्ट्री फार्म, गोठ फार्म, मच्छी व्यवसाय, मैत्रीचा चहा, माऊली वडेवाले याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री असे व्यवसाय करतो. यात तुम्ही १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा महिन्यात डबल देऊ शकतो. यासाठी तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास २० हजार रुपये महिन्याप्रमाणे दहा महिन्यात तुमच्या खात्यात किंवा रोखीने पैसे देईल, असे अमिष दाखवले. त्यानंतर ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 

गुंतवणूक करण्याचे ठरल्यानंतर अॅड. शिवाजी ज्ञानोबा जोगदंड यांच्याकडे १०० रुपयांच्या बाँडवर रक्कम व व्यवहाराचा उल्लेख करुन रोख ५० हजार रुपये साक्षीदार प्रभाकर हजारे यांच्याकडे दिले. त्यांनी पुढील दहामहिन्यानंतरच्या तारखेचा एक लाख रुपयांचा एचडीएफसी बँकेचा धनादेश दिला. त्यांनी बोलल्याप्रमाणे १० महीने खात्यावर ९ हजार ५०० रुपये प्रमाणे पुर्ण रक्कम मिळाली. विश्वास बसल्याने या स्कीमबद्दल मैत्रीणीला सांगितले. तिनेही गुंतवणूक केली. तसेच पुन्हा रोख ३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यानंतर कुठलाही परतावा मिळाला नाही. वारंवार परतावा देण्याच्या तारखा दिल्या, मात्र रक्कम मिळाली नाही. अशा पद्धतीने अनेकांची ५३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीत  यांची नावेया आर्थिक घोटाळ्यात रामेश्वर ओंकार करुळे, मिना ओंकार कुरुळे, ओंकार कुरुळे, शिवप्रसाद कुरुळे, नम्रता खरात (सर्व रा. लोखंडी सावरगाव, ता.अंबाजोगाई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व फरार असून अधिक तपास निरीक्षक विनोद घोळवे करत आहेत.

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार वर्गया प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून यामध्ये अंबाजोगाई तालुक्यातीलच गुंतवणूकदारांची मोठी संख्या आहे. त्यामुळे प्राथमिक तपास करुन हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड