शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परळीत पंगतीतील वाद रस्त्यावर आला; तरुणास अमानुष मारहाण, सात जण पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 11:40 IST

चार जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे

परळी: तालुक्यातील लिंबूटा येथील युवक शिवराज नारायण दिवटे याला थर्मल रोडवरून टोळक्याने मोटरसायकलवर बसवून टोकवाडीच्या माळावर नेऊन बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आज, शनिवारी सकाळी तातडीने कारवाई करत चार जणांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अपहरण आणि मारहाणीची ही घटना शुक्रवार, १६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता घडली होती.

या प्रकरणी शिवराज दिवटे याच्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. जलालपूर येथील एका मंदिरात पाहुण्यांच्या पंगतीसाठी गेले असता, जेवण करून परतताना थर्मल रोडवर पेट्रोल पंपाजवळ चार मोटरसायकलस्वारांनी शिवराजची वाट अडवली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने टोकवाडी रस्त्यावरील माळावर नेण्यात आले. येथे टोळक्याने लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी काठ्यांनी शिवराजला बेदम मारहाण केली. शिवराजच्या जबाबानुसार, सकाळी जेवणाच्या ठिकाणी काही तरुणांमध्ये वाद झाला होता आणि त्यावेळी तो उपस्थित होता. याच वादातून हे प्रकरण उफाळल्याचे त्याने तक्रारीत नमूद केले आहे.

आरोपींमध्ये तीन अल्पवयीनदरम्यान, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या नेतृत्वात या प्रकरणात तातडीने तपास करून कारवाई करण्यात आली. सध्या चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तीन अल्पवयीन आरोपी बालन्याय मंडळाच्या देखरेखीखाली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गंभीर दुखापत झालेल्या शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड