शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 19:03 IST

आगीत ४ म्हशी, ३ वासरे होरपळली, लाखोंच्या शेतमालाची राख झाली आहे

- मधुकर सिरसटकेज ( बीड) : शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने  सोयाबीन, कापूस, केबल वायर, पेंड, दिवाण, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. तर ४ म्हशी आणि ३ वासरे गंभीररित्या भाजल्याने शेतकरी गोविंद बारगजे यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी टाकळी येथे घडली.

गोविंद बारगजे हे टाकळीपासून जवळच असलेल्या डोणगाव येथे बैलगाडीद्वारे ऊसतोडीचे काम करतात. मंगळवारी सकाळी गोठ्यात 4 म्हशी, 3 वासरे बांधून बारगजे ऊस तोडणीसाठी गेले. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे गोठ्यात अचानक आग लागली. यात 20 पोते सोयाबीन, 5 क्विंटल कापूस, 5 क्विंटल पेंड, केबल वायर, दिवाण, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर 4 म्हशी, 3 वासरे गंभीररीत्या भाजले आहेत. यात शेतकऱ्याचे जवळपास 2 लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत देण्याची मागणी बारगजे यांनी तहसीलदार डी. सी. मेंडके यांच्याकडे केली आहे. 

एक म्हैस दावे तोडून पळाल्याने वाचले इतरांचे प्राणआगीत होरपळलेल्याने एक म्हैस दावे तोडून गोठयाबाहेर आली. तेव्हा शेजारच्या शेतकऱ्यांचे लक्ष गोठ्याकडे गेले. त्यानंतर नाथ्याबा बारगजे यांनी लागलीच 3 म्हशी व वासराचे दावे कुऱ्हाडीने तोडले. यामुळे त्यांचे प्राण वाचले मात्र म्हणी आणि वासरे गंभीर भाजले आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रीतमकुमार आचार्य त्यांच्यावर उपचार केले. याप्रकरणी आपत्कालीन पंचनामा करण्याचे आदेश संबंधित तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी दिली आहे.

टॅग्स :BeedबीडfireआगFarmerशेतकरीagricultureशेती