लिंबागणेश: बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉ. भारत मेंगडे व डॉ. प्रतिभा मेंगडे हे रविवारी सकाळी सव्वा ६ वाजण्याच्या सुमारास बोरखेड येथील शेतात बोअरवेल गाड्या आल्याने शेताकडे निघाले होते. महाजनवाडी फाट्यावर त्यांच्या व्हिस्टा इंडीका (एमएच २३ वाय २३२१) या कारमधून अचानक धूर निघू लागल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. क्षणातच गाडीने पेट घेतला. वायर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉ. भारत मेंगडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच डॉ. गणेश ढवळे, विक्रांत वाणी, सय्यद अख्तर, सुमित मुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांच्यासह शिवाजी घरत, सतीश घरत, ऋषिकेश घरत, अभिषेक घरत व अक्षय घरत यांनी आग विझविण्यासाठी मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.
Web Summary : A doctor couple in Limba Ganesh escaped a car fire due to their quick thinking. Their car caught fire due to a suspected short circuit. Locals helped extinguish the blaze, preventing any casualties, but the vehicle was damaged.
Web Summary : लिंबा गणेश में डॉक्टर दंपति अपनी सूझबूझ से कार में लगी आग से बाल-बाल बच गए। शॉर्ट सर्किट से उनकी कार में आग लग गई। स्थानीय लोगों ने आग बुझाने में मदद की, जिससे कोई हताहत नहीं हुआ, लेकिन वाहन क्षतिग्रस्त हो गया।