शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांच्या ८३ कोटींची लूट; किरीट सोमय्यांची जगमित्र कारखान्यातील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 16:04 IST

Kirit Somaiya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही.

अंबाजोगाई-: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी साखर कारखान्याच्या नावावर शेतकर्‍यांची ८३ कोटी रूपयांची लुट केली. या लुटीसाठी शेतकर्‍यांच्या जमिनी घेतल्या. तर ज्यांनी जमिनी दिल्या नाहीत अशा मयत व्यक्तींच्या नावानेही खोटी स्वाक्षरी केली. या सर्व बाबींचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण ईडीकडे केली आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी अंबाजोगाई येथे  आयोजित पत्रकार परिषदेत केला.

डॉ.किरीट सोमय्या गुरूवारी सकाळी अंबाजोगाईत दाखल झाले. त्यांनी नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास उपस्थिती दर्शविली. त्यानंतर ते पुस येथील जगमित्र साखर कारखान्याच्या परिसराला भेट दिली. या नंतर त्यांनी बर्दापुर पोलिस स्टेशनमध्ये जावून या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे झाला पाहिले अशी मागणी केली. त्यानंतर ते अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सोमय्या म्हणाले की, राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांनी पुस येथे जगमित्र साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून १० वर्षापूर्वी  ८३ कोटी रूपये  भागभांडवल म्हणून जमा केले. आज दहा वर्षे लोटली  तरीही साखर कारखान्याची उभारणी झाली नाही. हा सर्व पैसा, जमीन कुठे गेली? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मुंडे यांनी या जमिनी घेताना मृत व्यक्तीच्या नावाने स्वाक्षरी केल्याची तक्रार दाखल आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने चार दिवसापुर्वीच दिले आहेत. तर आपण ही या घोटाळ्या बाबत ईडीकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. ठाकरे व पवार यांचे पोलिस खाते आता कशा पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करते? ही मी पाहणार आहे. मुंडे ज्या मतदार संघातील आहेत.त्याच हद्दीत पोलीस ठाणे असल्याने होणाऱ्या पोलीस तपासा बाबत आपण राज्याचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सरकारच्या काळात दिवसेंदिवस भ्रष्टाचार व घोटाळे यांची मालिका सुरूच आहे. आलीबाबा व चाळीस चोर अशा या सरकारमधील काही मंत्री जेलमध्ये, काही मंत्री हॉस्पीटलमध्ये तर काहीजण बेलवर आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ते स्वतःच घोटाळे व भ्रष्टाचार करत असल्याने त्यांचे मंत्रीमंडळही याच कामात व्यस्त आहेत. महाराष्ट्रात घोटाळे बाजांजी मालिका सुरूच आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, हसन मुश्रीफ, खा.भावना गवळी, अर्जुन खोतकर, धनंजय मुंडे, प्रताप सरनाईक,अनिल परब, संजय राऊत, नवाब मलिक या सर्व लोकांचे घोटाळे आपण बाहेर काढले. यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणला. राज्यातील साडेबारा कोटी जनता, शेतकरी, विविध समस्यांनी त्रस्त असताना आघाडी सरकारमधील मंत्र्यांची जनतेकडून लुट सुरूच आहे. हे राज्य भ्रष्टाचार युक्त असून ते भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी माझी लढाई सुरूच राहील असे सोमय्या यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस आ.नमिता मुंदडा,अक्षय मुंदडा,भाजपा चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,प्रवक्ते राम कुलकणी,भाजपा चे तालुका अध्यक्ष अच्युत गंगणे उपस्थित होते.

‘ईनको मिर्ची लगी तो मै क्या करू?’धनंजय मुंडे यांच्या साखर कारखान्यातील घोटाळा उघड करण्यासाठी मी अंबाजोगाईला निघालो असताना मला सोशल मिडीया व विविध माध्यमातून धमक्या येवू लागल्या. अंबाजोगाईत आल्यानंतर तुमचं स्वागत मिर्ची पावडरने केले जाईल अशा धमक्या दिल्या. अशा धमक्यांना आपण भिक घालत नसुन ईनको मिर्ची लगी तो मै क्या करू?  अशा शब्दात त्यांनी धमक्या देणारांची खिल्ली उडविली.

संजय राउत यांची अवस्था ‘चोर मचाये शोर’संजय राउत ईडीची नोटीस आल्यानंतर मोठमोठ्याने आरडा ओरडा करत होते. नोटीस फाडुन टाकल्याचे नाटक त्यांनी मिडीया समोर केले. मात्र रात्रीच ईडीच्या कार्यालयात जावून 55 लाखांचा चेक देवून आले. चोरीचा माल परत केल्याने चोरी माफ होत नसते. अशी टिका राउत यांच्यावर करीत संजय राउत म्हणजे ‘चोर मचाये शोर‘ अशीच त्यांची स्थिती असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेKirit Somaiyaकिरीट सोमय्याSugar factoryसाखर कारखानेBeedबीड