शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवकासह ८ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:34 IST

जुन्या भांडणाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यापाऱ्यावर आठ जणांनी जिवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी जिल्हा रूग्णालयात घडली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व इतर ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जुन्या भांडणाच्या वादातून एका ४० वर्षीय व्यापाऱ्यावर आठ जणांनी जिवघेणा हल्ला केला. ही घटना २२ मे रोजी जिल्हा रूग्णालयात घडली होती. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व इतर ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सय्यद अमानउल्ला सय्यद रजाउल्ला (वय ४०, व्यवसाय व्यापार, झमझम कॉलनी) असे मारहाण झालेल्या व्यापा-याचे नाव आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार माजी उपनगराध्यक्ष सय्यद फारुक अली मुसल अली, नगरसेवक शेख अशफाक इनामदार यांच्यासह नवाज खान बिस्मिल्ला खान, सय्यद फसदउल्ला सय्यद सुजदउल्ला, सय्यद मुजाहेद अली स. नुसरत अली, शेख आवेज इनामदार, नसीम खान, अजगर खान यांचा आरोपींत समावेश आहे.२२ मे रोजी बशीरगंज भागात एकमेकांकडे टक लावून पाहिल्याने हा वाद उफाळून आला होता. त्यानंतर शहर ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती. त्याच रात्री साडेदहा वाजता सय्यद अमानउल्ला सय्यद रजाउल्ला हे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. वॉर्ड क्र.५ मध्ये ते उपचार घेत असताना तेथे आठ जण आले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आठ लोक लोखंडी गज, काठ्या, फायटर घेऊन तेथे आले आणि मारहाण करू लागले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, यातील काही नावे हे अंतर्गत वादातून गोवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात हे लोक घटनास्थळी भांडणे सोडविण्यासाठी आल्याचे सांंगण्यात आले. मात्र, जखमीने जबाबात ही सर्व नावे घेतल्याने गुन्हा नोंदविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.पाठलाग करून दोघे गजाआड : सहा आरोपी अद्यापही फरारगुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण आरोपींना लागली. ते लगेच बीड शहरातून फरार होत होते.रात्रीच्या सुमारास ते मांजरसुंबा मार्ग एका जीपमधून फरार होत होते. याचवेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.माजी उपनगराध्यक्ष सय्यद फारुक अली मुसल अली, नगरसेवक शेख अशफाक इनामदार या दोघांना बेड्या ठोकल्या. अद्यापही सहा आरोपी फरार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस