शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

पाठलाग करून पकडले ७५ हजार लिटर बायोडीझेल; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 19:37 IST

एक टँकर केज जवळ तर तीन टँकर हे नांदेड आणि लोहा येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतले.

- दीपक नाईकवाडेकेज ( बीड ) : जिल्ह्यात तेहतीस लाख रुपयांच्या अवैध गुटख्यावर शिसेनेच्या जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर कारवाईचे प्रकरण ताजे असतानाच आज सुमारे एक कोटी रूपयांपेक्षा अधिक रक्कमेचे बोगस बायोडिझेल पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अवैध धंद्यांच्याविरुद्ध या दोन्ही कारवायां सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने केल्या. 

या बाबतची अधिक माहिती अशी की, १८ नोव्हेंबर रोजी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर हे केजमार्गे नांदेडकडे जात आहेत. यावरून कुमावत यांनी दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता मस्साजोग येथे पथकामार्फत सापळा लावला. त्यावेळी त्यांना एक टँकर आढळून आले. कुमावत यांनी टँकरचा पाटलाग करून ड्रायव्हरला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता चालकाने टँकरमधील बायोडिझेल नांदेड येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. 

तसेच चालकाकडून मिळालेल्या माहितीवरून कुमावत यांनी पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. नांदेड येथून पथकाने चार टँकर (एमएच४६/जे इ ११०६), (एमएच-०४/ जीएफ-९८७३), (एमएच-२६/एच-८४९६), एक स्कॉर्पिओ (एमएच-२१/एएक्स-१३५६) ,एक कार (एमएच-२६/टी-९९९९) ताब्यात घेतले. यावेळी तीन टँकर्समध्ये प्रत्येकी २५ हजार लिटर असे सुमारे ७५ हजार लिटर्स बायोडिझेल आढळून आले. याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई केज उपविभागीय पोलिस पथकातील बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चोपणे, सचिन अहंकारे, महादेव सातपुते, राजू वंजारे, सुहास जाधव यांच्यासह परळी पोलीस स्टेशनचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, विष्णू फड आणि किशोर घटमल यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस