शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

७०/३० विरुद्ध बीडमधून उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:31 IST

वैद्यकीय प्रवेशासाठी शासनाच्या ७० /३० प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागत असून याविरुद्ध शुक्रवारी झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन, न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देवैद्यकीय प्रवेशासाठी प्रादेशिक आरक्षणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वैद्यकीय प्रवेशासाठी शासनाच्या ७० /३० प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागत असून याविरुद्ध शुक्रवारी झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन, न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान २० मे रोजी बीड येथे या संदर्भात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिली.

येथील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली. या वेळी समाजकल्याण सभापती संतोष हंगे, भाशिप्रचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, सलीम जहांगीर, दिलीप लोढा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीत वैद्यकीय प्रवेशासाठी प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल उपस्थितांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत या प्रश्नी सामाजिक लढा उभारण्याची गरज व्यक्त केली. संतोष हंगे यांनी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आणि गंभीर असून जास्तीत जास्त पालकांना या शैक्षणिक आंदोलनात सहभागी करु अशी ग्वाही दिली. माजलगावचे डॉ. शामसुंदर काकाणी यांनी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी आरक्षण नाही, मग प्रवेशालाच आरक्षण का? असा सवाल केला. तर प्रा. चंद्रकांत मुळे, सलीम जहांगीर यांनी न्यायालयाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी रमेश पोकळे म्हणाले, मराठवाड्यातील गुणवत्ता थोपविण्याचा प्रकार खपवून घेणार नसून या धोरणाविरुद्ध आक्रमक प्रतिकाराची गरज आहे. ७०/३० धोरण रद्द करावे याबाबतीत पालकमंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचे पोकळे यांनी सांगितले.

२२ ते ३० मे दरम्यान मराठवाड्यात सर्वत्र बैठक घेवून तेथील जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊ असेही ते म्हणाले. या प्रश्नावर शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यामुळे २० मे रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पालक तसेच शिक्षणप्रेमी व वैद्यकीय शिक्षण संघर्ष समितीची व्यापक बैठक घेऊ असे पोकळे म्हणाले. यावेळी डॉ. राजेश भुसारी, सुनिल परजणे, सुरेश ढास, बापुसाहेब शिंदे, आनंद पिंगळे, दिलीप लोढा, मनिषा जायभाये, बाळकृष्ण थापडे, सुनिल नागरगोजे, पी. एस. केदार, मनोज नागरगोजे, ए. बी. ढेरे, सुरेश ढास, अजित मुळूक, श्रीकृष्ण थापडे, नारायण गवते, मनोज फरके, ज्ञानदेव काशीद, शरद दुगड, भाऊसाहेब केदार, व्ही. बी. शिंदे, विकास गवते यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पालक उपस्थित होते.मराठवाडा पेटला तर शांत बसत नाही...!मराठवाड्यातील मुलांचे भविष्य सुकर करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. मेहनत करुन आमच्या मुलांवर अन्याय होत असेल तर संघर्ष करावाच लागेल. एक तर अशा प्रश्नांवर मराठवाडा पेटत नाही, आणि पेटला तर प्रश्न निकाली निघेपर्यंत शांत बसत नाही. या प्रश्नी होणाºया संघर्षासाठी एकजुटीची गरज आहे.- संतोष हंगे, समाज कल्याण सभापती, जि. प. बीड.बैठकीतील सूर : सामाजिक लढा उभारा७०/ ३० धोरणामुळे मराठवाडा आणि इतर विभागातील मुलांमध्ये २० गुणांचा फरक पडत असल्याने गुणवत्ता असूनही मराठवाड्यातील मुले वंचित राहत असल्याचे डॉ. राजेश भुसारी म्हणाले. मराठवाड्याच्या प्रश्नावर सामाजिक लढा उभारावा असे मत सुरेश ढास यांनी व्यक्त केले. वैद्यकीय प्रवेशासाठी प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यावर अन्याय होत आहे. यासाठी सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी एकत्रित आले पाहिजे. मराठवाड्यातील जागा वाढवाव्यात यासाठी सरकारकडे आग्रह धरावा असे बापूसाहेब शिंदे म्हणाले.बारावी नीटनंतरचे प्रवेश ज्या धर्तीवर होतात, त्याप्रमाणे राज्यात वैद्यकीय प्रवेशाचे धोरण असावे. ७०/३० धोरणाबद्दल शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. एक- एक गुणासाठी मराठवाड्यातील मुलांवर अन्याय होतो. यासाठी न्यायालयात जाणे हाच मार्ग असल्याचे प्रा. चंद्रकांत मुळे यांनी सांगितले.७०/ ३० प्रादेशिक धोरणाविरुद्ध सामूहिक लढा लढण्याची गरज दिलीप लोढा यांनी व्यक्त केली.मनीषा जायभाये यांनी प्रादेशिक धोरण, जातीनिहाय आरक्षणाशिवाय माजी सैनिकांच्या आरक्षणात होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले. माजी सैनिकांसाठीचे आरक्षण विभागापुरते मर्यादीत नसावे असे त्या म्हणाल्या.

बीडपासून वणवा पेटवूया प्रश्नावर लढा देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण हक्क संघर्ष समिती स्थापन करावी, यात पालक, विद्यार्थी, सर्व संघटनांना सोबत घेवून मराठवाड्याच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बीडपासून वणवा पेटवू. समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांपर्यंत पाठपुरावा करावा.- आनंद पिंगळेपंजाबराव देशमुख शिक्षक परिषद.

कायम लढा देणारमराठवाडा वैधानिक विकास मंडळ रस्ते, पाणी, नाल्यापर्यंतच मर्यादीत राहिले. शिक्षण क्षेत्रातील अनुशेषही भरुन काढावा लागणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी ७०/३० प्रादेशिक धोरण तसेच या विषयाशी निगडीत इतर प्रश्नांचा कायमस्वरुपी इलाज होईपर्यंत लढा सुरु ठेवावा लागणार आहे. यात मराठवाड्यातील जनतेने सहभागी व्हावे.- रमेश पोकळेजिल्हाध्यक्ष भाजपा, बीड.

टॅग्स :BeedबीडMedicalवैद्यकीयeducationशैक्षणिकMarathwadaमराठवाडा