बीड : राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या बारावीच्या परीक्षेत बुधवारी ७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. बुधवारी जीवशास्त्र विषयाची परीक्षा होती. गेवराई तालुक्यातील गढी येथील जयभवानी महाविद्यालय परीक्षा केंद्रात तपासणीदरम्यान शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांच्या पथकाने ४ विद्यार्थ्यांवर रेस्टिकेटची कारवाई करण्यात आली. याच पथकाने पाडळशिंगी येथील केबीडी हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज परीक्षा केंद्रावर तपासणी दरम्यान कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. बीड तालुक्यातील चौसाळा येथील कला, वाणिज्य महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (मा.) भगवानराव सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बारावीच्या जीवशास्त्र परीक्षेत ७ जण रेस्टीकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:56 IST