शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील ७ सराईत आरोपी जेरबंद; गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 17:23 IST

सातही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत

- मधुकर सिरसटकेज :  अंबाजोगाईकडून नेकनूरकडे चारचाकीतून ( एम एच 46 सी एम 1934 ) जाणाऱ्या ७ सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मंगळवारी मध्यरात्री केज येथील बसस्थानक परिसरातून पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक गावठी कट्टा,  ५ जिवंत काडतुस आणि दरोडा टाकण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले.

सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारावरून केज बसस्थानक परिसरात सापळा लावला. मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान संशयीत चारचाकीला अडविण्यात आले. झडती घेतली असता आरोपींकडे एक गावठी कट्टा, ५ जिवंत काडतुसे, २ लोखंडी रॉड, स्क्रु ड्रायव्हर, एक लाकडी दांडका आढळून आला. याप्रकरणी आज पहाटे पोलीस नाईक विकास चोपने यांच्या फिर्यादीवरून  गणेश पांडुरंग भोसले, (रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई ),  हरीष तोमर देवडीगा, (रा. बजेगली ता. कारकला जि. उडपी राज्य कर्नाटक ह. मु. डोंबीवली, मुंबई जि. मुंबई,) , नारायण मंगळा करण, (रा. महेशा ता. कृष्णप्रसाद जि. पुरी राज्य ओडीसा ह.मु. सायन मुंबई,),  श्रीनिवास आशाअली बारगम,( रा. संत ज्ञानेश्व नगर गर्व्हमेंट कॉलनीच्या बाजुला बांद्रा पूर्व मुंबई,),  श्रावण शिवाजी गायकवाड,( रा. बोरीवली मुंबई,) , दिपक दशरथ चाटे ऊर्फ ताठे,(रा, धर्मेनाका कामगार नगर-2 मुंबई,), नामदेव परसु पोवार, (रा. कामोठा नवी मुंबई ता. पनवेल जि. रायगड) या ७ आरोपी विरुध्द कलम 399 भादंवि सह कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा नुसार केज पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकुर , अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक  चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार, भुंबे, शहादेव म्हेत्रे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी केली.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड