शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे ६६ किलोमीटरचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 06:11 IST

पुढचा टप्पा आष्टी ते इग्नेवाडी : विद्युतीकरणाचे कामही सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अहमदनगर-बीड-परळी नवीन रेल्वेमार्गाचे ६६.१८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर एकूण २३ स्थानके असून, अहमदनगर ते आष्टीपर्यंत ६६.१८ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे तर आष्टीपासून इग्नेवाडीपर्यंतचे ६७.१२ किलोमीटरचे काम प्रगतिपथावर आहे.

सुमारे ४ हजार ८०५.१७ कोटी रुपयांचा अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा एकूण २६१.२५ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. या मार्गासाठी १८१४.५८ हेक्टर जमीन संपादित केली असून भूसंपादनाचे काम ९९.५३ टक्के झालेले आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या ६६.१८ किलोमीटरच्या अंतरात ७ रेल्वे स्थानके आहेत. यात अहमदनगर, नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा आणि आष्टी येथील स्थानकांचा समावेश आहे. आष्टी स्थानकापासून पुढे किनी, बावी, अंमळनेर, जाटनांदूर, इग्नेवाडीपर्यंतचे ६७.१२ किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम या वर्षभरात पूर्णत्वाकडे जाईल, अशी खात्री रेल्वे विभागाने दिली आहे.

डेमू रेल तूर्त बंद : गतवर्षी सप्टेंबरमध्ये अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी ‘डेमू रेल्वे’ सेवा सुरु केली होती. परंतु अवघ्या दहा महिन्यांत ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांचा अल्प प्रतिसाद, चालकांची कमतरता तसेच अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे १३ ऑक्टोबरपर्यंत या डेमू रेलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.   

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडAhmednagarअहमदनगर