शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बीड जिल्ह्यामध्ये  ६१ हजार १५७ मतदार संशयित; डबल नावे यादीतून वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 2:18 PM

जिल्ह्यात ६१ हजार १५७ मतदार संशयित असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.

ठळक मुद्दे २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

बीड : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नवीन मतदार वाढवणे तसेच बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबली जात असून जिल्ह्यात ६१ हजार १५७ मतदार संशयित असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली.

येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूका सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने २१६५ मतदान केंद्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंदणी करणे. मयत, दोन किंवा अनेक ठिकाणी मतदान यादीत असलेल्यांची नावे वगळणे, मतदान यादीतील नावे दुरूस्ती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. आगामी निवडणूकीत मतदार म्हणून आपल्या अधिकाराबाबत  मतदारांमध्ये  जनजागृती केली जाणार आहे. तसेच नवमतदार नोंदणीवर भर देण्यात येणार आहे.  आगामी  निवडणूका पारदर्शकपणे, शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती देखील  जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी प्रवीण धरमकर, उप जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे हे उपस्थित होते. 

सोयीनुसार दोन मतदार संघात नावेसंपूर्ण जिल्ह्यात तब्बल ६१ हजार १५७ मतदार संशयास्पद आहेत. यातील काही मतदार शहरी व ग्रामीण भागातील यादीत असल्याची माहिती  जिल्हा निवडणूक विभागाच्या निदर्शनास आली आहे. एकाच व्यक्तीचे अनेक  मतदार यादीतील नाव देखील या कार्यक्रमाद्वारे वगळण्यात येणार आहेत.मतदान केंद्रे वाढवणार 

जिल्ह्यात २१ हजार १६५ मतदान केंदे्र आहेत. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली जाणार आहे. कोणत्या कक्षात, प्रभागात आपले मतदान आहे, हे पाहणे नागरिकांना जिकिरीचे असते. एकाच कुटुंबाचे मतदान वेगवेगळ््या प्रभात किंवा कक्षात आल्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण होते. याला आळा घालण्यासाठी एखादे कुंटुंब, वस्ती, शहरातील अपार्टमेंट, यांच्यासाठी एकच मतदार केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून नागरिकांना मतदानाचा हक्क बजावताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

मतदारांची संख्या वाढणार जिल्ह्यात १० लाख ५० हजार २८६ पुरूष मतदार तर ९ लाख २३ हजार ९६२ स्त्री तसेच व १० तृतीयपंथी असे एकूण १९ लाख ७४ हजार २५८ मतदार आहेत. यामध्ये  ४० ते ६० हजार मतदारांची वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

कृष्णधवल फोटो बदलणार४१ हजार ३३३ मतदारांचे कार्डवरील कृष्णधवल फोटो तसेच जुने लहानपणीचे फोटोदेखील बदलले जाणार आहेत.पूर्वीच्या मतदार कार्डवर १६ अंकी क्रमांक होते त्यात देखील बदल होणार आहेत.

मतदार जनजागृती...मतदानाच्या दृष्टीने जनजागृती व्हावी यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, समाजशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचे शिक्षक यांच्यामार्फत  ६०० ठिकाणी मतदार साक्षरता क्लब राबवले आहेत.  

संशयास्पद मतदार गेवराई     ११६६१बीड        १०५८२आष्टी    १०८३९केज        १०५३७परळी        ८४५७माजलगाव    ९०८१एकूण    ६११५७

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार