शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातील 60 हजार शेतकरी बोंडअळीच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 19:55 IST

तालुक्यातील साठ हजार शेतकर्‍यांना बोंडअळीच्या नुकसानी पोटी शासनाने जाहीर केलेली अनुदानाची रक्कम अद्यापही मिळाली नाही.

ठळक मुद्देअनुदानाची रक्कम पेरणीसाठी उपयोगी पडेल या आशेवर शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

केज ( बीड ) : तालुक्यातील साठ हजार शेतकर्‍यांना बोंडअळीच्या नुकसानी पोटी शासनाने जाहीर केलेली अनुदानाची रक्कम अद्यापही मिळाली नाही. अनुदानाची रक्कम पेरणीसाठी उपयोगी पडेल या आशेवर शेतकरी रक्कमेची प्रतीक्षा करत आहेत.

तालुक्यातील शेतकर्‍यांनी गेल्या वर्षी च्या खरीप हंगामात नगदी पीक असलेल्या कापसाची लागवड 39 हजार 145 हेक्टर क्षेत्रावर केली होती कापसाच्या पिकाची मशागतीसह कापसावरील कीडीचा प्रतिबंध करण्यासाठी कापसावर औषधांच्या फवारणीही केल्याने कापसाचे पीक बहरात आले कापसाचे पिक बहरात आल्यानंतर कापसाला बोंड लागण्यास सुरवात झाल्यानंतर कापसाच्या बोंडाच्या आत शेंदरी बोंडअळीने हल्ला चढवल्याने शेतकर्‍यांच्या हातुन कापसाचे पीक गेल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. कापसाचे बोंडअळीने झालेल्या नुकसानीपोटी शासनाने शेतकर्‍यांना सहा हजार आठशे रुपये प्रमाणे हेक्टरी अनुदान जाहीर केले होते.

चालु वर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानाची रक्कम कामी येईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती मात्र तालुक्यातील साठ हजार शेतकर्‍यांच्या बँकेच्या खात्यात अद्यापही शासनाने जाहीर केलेले बोंडअळीचे अनुदान जमा झाले नसल्याने बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम खात्यात केंव्हा जमा होणार याची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत.

सात कोटीचे अनुदान वाटपतालुक्यातील 39 हजार 145 हेक्टर वरील कापसाच्या पिकांचे बोंडअळीने नुकसान झाले आहे तालुक्यातील 38 गावातील 19 हजार 64 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सात कोटी 9 लाख 82 हजार 933 रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे नायब तहसीलदार आशा वाघ यांनी दैनिक लोकमतशी बोलताना सांगितले.

दोन हप्ते शिल्लक आहेतपहिल्या हप्त्यातील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात आली आहे बोंडअळीच्या अनुदानाच्या रक्कमेचे दोन हप्ते शिल्लक असल्याचे तहसीलदार अविनाश कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसState Governmentराज्य सरकारfundsनिधीFarmerशेतकरी