शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

५१३२ अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:16 IST

अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून अंबाजोगाई, शिरु र व पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भाऊबीज भेट, परिवर्तनिय निधीची रक्कम ३१ आॅक्टोबर पुर्वीच त्यांच्या खात्यावर जमा केली आहे.

ठळक मुद्देदिवाळी होणार गोडपाटोदा, शिरु र, अंबाजोगाई तालुक्यातील रक्कम खात्यावर जमा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वसामान्यांसह गोरगरिब मुलांवर संस्कार करणाऱ्या व राज्याच्या भविष्याचा पाया भक्कम करणाºया अंगणावाडी सेविकांना मागील वर्षीपासून भाऊबीज भेट दिली जाते. यावर्षी या भेटीच्या रक्कमेत ८०० रु पये वाढ करण्यात आली आहे. ही भाऊबीज भेट वेळेत मिळून अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला असून अंबाजोगाई, शिरु र व पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची भाऊबीज भेट, परिवर्तनिय निधीची रक्कम ३१ आॅक्टोबर पुर्वीच त्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर उर्वरित तालुक्यातील निधीही लवकरच जमा केला जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी सांगितले.राज्यातील गोरगरिबांच्या मुलांना नर्सरी, प्री-प्रायमरी सारख्या शाळा, कॉन्वेंट शाळांमध्ये पाठवणे शक्य नाही. अशावेळी राज्याचे भविष्य असलेल्या या सर्वसामान्यांच्या मुलांवर संस्कार रुजवण्याचे काम राज्यातील अंगणवाड्यांमधून होते. पुढील पिढीचा पाया भरभक्कम करण्यात अंगणवाडी सेविकांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या वतीने गतवर्षीपासून अंगणवाडी सेविकांना दिवाळीमध्ये दोन हजार रुपयांची ‘भाऊबीज’ भेट दिली जात आहे. यावर्षी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी यामध्ये साडीसाठी ८०० रुपयांची वाढ केली आहे. परंतू भेट म्हणून दिली जाणारी मदत अंगणवाडी सेविकांना वेळेत मिळावी यासाठी बीड जिल्हा परिषदेने तत्परतेने पाऊले उचलली.जिल्ह्यात ५ हजार १३२ अंगणवाडी सेविका व मदतनिस आहेत. त्यांना भाऊबीज भेट म्हणून २००० रुपये, परिवर्तनिय निधी-मोठी अंगणवाडी २ हजार व मिनी अंगणवाडी एक हजार रुपये या प्रमाणे दिला जाणार आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर हा निधी वेळेत मिळावा यासाठी जि.प. अध्यक्ष सविता गोल्हार, सीईओ अमोल येडगे, महिला व बाल कल्याण सभापती शोभा उद्धव दरेकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून अंबाजोगाई, शिरुर, पाटोदा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या खात्यावर ‘भाऊबीज’ भेट जमा करण्यात आली आहे. सदर रक्कम ही ३१ आॅक्टोबरपूर्वीच जमा करण्यात आली असून, उर्वरित तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनाही ४ नोव्हेंबर पुर्वी रक्कम दिली जाणार आहे. दिवाळीपुर्वी त्यांना ही मदत करुन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सध्या प्रशासन करत आहे. वेळेपुर्वीच मदत मिळत असल्याने अंगणवाडी आणि मदतनिसांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.निधी ३३ लाख रुपयांच्या घरातबीड जिल्ह्यात २४९० मोठ्या अंगणवाडी आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची संख्या जवळपास ४ हजार ९८० आहे. तर ५५० मिनी अंगणवाड्या आहेत. सेविका आणि मदतनीस यांची संख्या ११०० इतकी आहे. भाऊबीज भेट, परिवर्तनीय निधी व गणवेशासाठी (साडी) वितरित केला जाणारा निधी जवळपास ३३ लाख रुपयांच्या घरात आहे.

टॅग्स :BeedबीडEducationशिक्षण