शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात बारदाण्याअभावी ५ हजार क्विंटल हरभरा उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:40 IST

शासनाने सुरु  केलेल्या हमी भाव केंद्रावर बारदाणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा खरेदी अभावी उघड्यावर पडून असल्याने अवकाळीच्या भितीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठळक मुद्देमाजलगाव बाजार समितीकडून २४ एप्रिलपासून ४४०० रुपये या हमीभावाने हरभरा खरेदी सुरु  करण्यात आली १४ मे पासून माल घेण्यास बारदाणा नसल्याने केंद्र बंद आहे

माजलगाव (बीड ):  शासनाने सुरु  केलेल्या हमी भाव केंद्रावर बारदाणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा खरेदी अभावी उघड्यावर पडून असल्याने अवकाळीच्या भितीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

तालुक्यात हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने शासनाने नाफेडच्या माध्यमातून माजलगाव बाजार समितीकडून येथील टीएमसी आवारात २४ एप्रिलपासून ४४०० रुपये या हमीभावाने हरभरा खरेदी सुरु  करण्यात आली. हे खरेदी केंद्र १४ मे पासून शेतकऱ्यांचा माल घेण्यास बारदाणा नसल्याने बंद असून शेकडो शेतकऱ्यांनी आपला माल टीएमसी शेडमध्ये जागा नसल्याने उघड्यावर ठेवलेला आहे. त्यामुळे  सध्या सुरु  असलेल्या वादळी वाऱ्याने मात्र हरभरा भिजतो की काय? या भितीने त्यांचा जीव टांगणीला लागला असून, यावर तात्पुरते प्लास्टिक झाकले आहे. 

रोज सुटत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने हे सर्व उडून जात असल्याने शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धांदल उडत आहे.  पावसाने आलेला हरभरा भिजतो की काय? ही भिती त्यांना सतावत आहे. या केंद्रावर २० दिवसांच्या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने ३१० शेतकऱ्यांचा  ४ हजार ४८८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. तर ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा परिसरात उघड्यावर पडून असल्याने अनेक शेतकऱ्यांचे पूर्व मशागतीची कामे पैशाअभावी खोळंबली आहेत. तातडीने उपाययोजनेची मागणी होत आहे. 

वादळ, वाऱ्याची धास्तीयेथील टीएमसी आवारात शेडही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना उघड्यावर तूर ठेवावी लागत आहे. तर ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा पडून आहे. सध्या वादळी वारा व पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी या उघड्यावरील हरभऱ्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. 

१४ मेपासून झाली हरभरा खरेदी बंदबाजार समितीच्या खरेदी केंद्रावर ५ ते ६ हजार क्विंटल हरभरा बारदाण्याअभावी खरेदी करता येत नसून लवकरच बारदाणा उपलब्ध करुन खरेदी सुरु  करण्यात येईल.- नीळकंठ भोसले,उपसभापती बाजार समिती

गोदाम उपलब्ध नाही

टीएमसी शेडमध्ये यापूर्वी खरेदी केलेली तूर पडून असल्याने हरभरा नाईलाजाने बाहेर ठेवावा लागत आहे. तुरीसाठी गोदाम उपलब्ध होताच हरभरा सुरक्षित ठिकाणी ठेवला जाईल.- एच.एन.सवने, प्र.सचिव बाजार समिती

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र