शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईपोटी १४४ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:32 IST

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून १४४ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७५९ शेतक-यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पेरणी झालेल्या ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रमुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मका, यासह इतर फळबाग केळी, पपई, मोसंबी यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून जलद गतिने करण्यात आले होते. यामध्ये महसूल, कृषी व जि.प. कर्मचा-यांचा समावेश आहे. नुकसानीचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी नुकसानभरपाईसाठी ५०१४ कोटी ८१ लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. त्यानूसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १४४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच हा सर्व निधी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आला असून हा निधी शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. दरम्यान शेतक-यांच्या खात्यावर नुकसानभरपाई निधी तात्काळ जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.अतिवृष्टी बाधित शेतक-यांना २ हेक्टरच्या सरासरी नुकसानभरपाई निधी मिळणार आहे. यामध्ये हेक्टरी ८ हजार रुपये तर फळबागांसाठी १८ हजार रुपये अशी नुकसानभरपाई रक्कम मिळणार आहे. मिळणारी ही रक्कम अतिशय तुटपुंजी असून, सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी केली आहे.शेतक-यांना विमा तसेच वाढीव नुकसान भरपाई द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभरात रस्त्यावर उतरेल, असे देखील करपे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

टॅग्स :fundsनिधीFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकारRainपाऊस