शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांगली ४७ तोळे चोरी: '१०० किमी' सीसीटीव्ही फुटेज तपासले, चोरांच्या म्होरक्यास बीडमध्ये अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:33 IST

सांगली पोलिसांनी बीड कनेक्शनमधून उलगडले ४७ तोळे सोने चोरीचे रहस्य, म्होरक्या ताब्यात

-नितीन कांबळेकडा (बीड): सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरून नेल्याच्या थरारक घटना घडल्या होत्या. दिवसाढवळ्या झालेल्या या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अखेर, सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या.

बीडमधील 'कासारी' कनेक्शनसांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले (वय २५) हा असल्याचे निष्पन्न झाले. सांगली पोलिसांच्या पथकाने १०० किलोमीटरहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी केली, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींना ओळखले आणि त्यांच्या दुचाकीच्या नंबरवरून आरोपींचा माग काढला. पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या आरोपीने (मोहन भोसला) घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले.

थरारक अटक सत्रमंगळवारी रात्री आष्टी पोलिसांची मदत घेऊन सांगली पोलिसांनी कासारी येथील पारधीवस्तीवर छापा टाकला. अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईत संतोष उर्फ नितेश मर्दान भोसले याला त्याच्या राहत्या घरी बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे पोलिसांवरील दबाव काहीसा कमी झाला असला, तरी या टोळीतील तिसरा साथीदार अतुल नवनाथ भोसले हा अद्याप फरार आहे.

तीन घरफोड्यांमध्ये तब्बल ४७ तोळे सोने चोरीलाया तीन घरफोड्यांमध्ये तब्बल ४७ तोळे सोने चोरीला गेले होते. भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. 'दिवसादेखील घरात सुरक्षित नाही का?' असा प्रश्न नागरिक विचारत असताना, या आंतरजिल्हा टोळीच्या अटकेमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आष्टी पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह प्रवीण क्षीरसागर, मजरूद्दीन सय्यद आणि सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. फरार आरोपीला पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli robbery solved: 47 tolas recovered; thieves caught in Beed.

Web Summary : Sangli police cracked a daytime robbery of 47 tolas of gold, arresting the main suspect from Beed district. Extensive CCTV footage analysis and witness identification led to the arrest. One accomplice remains at large; investigation ongoing.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड