शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या विमानतळासाठी तीन गावांतील शासकीय व खासगी ३०८ हेक्टर जमीन प्रस्तावित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:05 IST

बीड येथील नियोजित विमानतळासाठी मौजे कामखेडा, दगडी शहाजानपूर व आहेर चिंचोली या तीन गावांतील ११७.०४ हेक्टर शासकीय जमीन व १९१.२८ हेक्टर खासगी अशी एकूण ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित

बीड : नियोजित विमानतळाच्या जागेसह अन्य दोन विषयांच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी विकासकामांचा आढावा घेतला. बीड तालुक्यातील नियोजित विमानतळ जागेसाठी शासकीय व खासगी अशी एकूण ३०८ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा व्हीसीद्वारे पालकमंत्री पवार यांनी २५ जून रोजी घेतला. या बैठकीस सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या तीन महत्त्वाच्या कामाची सद्य:स्थिती नमूद केली. बीड येथील नियोजित विमानतळासाठी मौजे कामखेडा, दगडी शहाजानपूर व आहेर चिंचोली या तीन गावांतील ११७.०४ हेक्टर शासकीय जमीन व १९१.२८ हेक्टर खासगी अशी एकूण ३०८.३२ हेक्टर जमीन प्रस्तावित करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी स्वत: जागेची पाहणी केली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी विमानतळासाठीची जागा सुयोग्य आहे का? हे तपासण्यासाठी प्री-फेसिबिलिटी स्टडीची माहिती मागवून घेत याबाबतच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे रुपये ४०.३२ लाख निधी दिला असल्याचे सांगण्यात आले. तसेच रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने ट्रॅक्शन सबस्टेशन आष्टी येथील कामाचा आढावा घेण्यात आला. सदर रेल्वे लाईनवरील २३ पैकी १७ मनोऱ्यांचे काम महापारेषण मार्फत करण्यात आले आहे. उर्वरित चार मनोऱ्यांचे काम प्रगतिपथवार असून, १५ जुलैपर्यंत सदरील काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्ताव सादरपरळी तालुक्यातील लोणी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी होत आहे. त्यासाठी लोणी येथील ८.८० हेक्टर व परळी येथे २० हेक्टर अशी २८.८० हेक्टर जमिनीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या जागेची पाहणी पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. ही जमीन प्रदान करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभिप्रायसुद्धा शासनाकडे सादर केला आहे. ही जमीन विद्यापीठाकडे वर्ग झाल्यानंतर सदरील ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी सुरू होईल.

मोजणीच्या तारखा निश्चितअहमदनगर-बीड परळी रेल्वे मार्गाच्या कामांमध्ये प्रामुख्याने रेल्वे विभागाकडून माजलगाव, बीड व परळी उपविभागामध्ये एकूण १३ गावांमध्ये नव्या क्षेत्राचे भूसंपादनाचे प्रस्तावांतर्गत संयुक्त मोजणीचा तारखा जून महिन्याच्या शेवटच्या व जुलै महिन्याचे पहिल्या आठवड्यात निश्चित करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी नमूद केले. त्याअनुषंगाने सदर मोजणीची कार्यवाही नेमलेल्या तारखेस पूर्ण करावी व त्यानंतर अंतिम निवाड्याची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :BeedबीडAirportविमानतळAjit Pawarअजित पवार