शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत २७ लाख रुपयाचा ३० पोते गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 19:04 IST

पोलीसांना पाहून टेम्पो चालक अंबाजोगाई शहरात न येता पळून जाण्यासाठी  लोखंडी सावरगावकडे वळला.

ठळक मुद्देपोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून टेम्पो पकडला

अंबाजोगाई : २६ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटखा अवैध व बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी जात असताना अंबाजोगाई पोलिसांनी कारवाई करून जप्त केल्याची घटना गुरुवारी दुपारी अंबाजोगाई शहराजवळील आडस फाट्याजवळ घडली. महीनाभरापासून  परळी तालुक्यात आणि अंबाजोगाई तालुक्यामध्ये सातत्याने गुटख्याची धरपकड सुरू असल्याकारणाने अवैध व बेकायदेशीररित्या गुटख्याची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

अंबाजोगाई  येथे नव्याने रुजु झालेल्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे ,पोलीस कर्मचारी आवले एम.व्ही., प्रकाश सोळंके ,नागरगोजे   यांनी ही कारवाई केली आहे.नव्याने रूजू झालेल्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती  भोर आणि पोलीस उपनिरिक्षक धस यांनी अवैध व बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या गुटखा विक्रीविरूद्ध  विशेष लक्ष्य केंद्रीत केले आहे. 

गुरूवारी दुपारी लातुरहून अंबाजोगाई शहरात अवैध व बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी गुटख्याचे तीस पोते ( १८० बॅग )घेउन टेम्पो क्र एम.एच.१३ सी.यु.४५६८ येत होता .याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळाली. तात्काळ शहर पोलीसांनी लातुर चौकात सापळा रचला.उपस्थित पोलीसांना पाहून टेम्पो चालक अंबाजोगाई शहरात न येता पळून जाण्यासाठी  लोखंडी सावरगावकडे वळला. परंतु पोलीसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून लोखंडी सावरगावच्या पुढे आडस फाट्यानजीक त्यास गुटख्यासह ताब्यात घेतले. गुटख्याची एकूण किंमत २६ लाख ७० हजार रूपये ऐवढी असल्याचे पोलीसांनी सांगितले. गुटख्याची पोते,ट्रक चालक व ट्रक ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया पोलीसांकडून सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड