शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२५ हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी, कंपाऊंडर जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:35 IST

वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले.

ठळक मुद्देएसीबीची कारवाई : वेतन काढण्यासाठी मागितली होती लाच; आरोग्य केंद्रातच कारवाईचे ‘इंजेक्शन’

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : वेतन व धनादेश काढण्यासाठी कर्मचाऱ्याकडून २५ हजार रूपयांची लाच घेताना भावठाणा (ता.अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या कंपाऊडरला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सकाळी ११ वाजता आरोग्य केंद्रातच केली.महादेव पांडुरंग केंद्रे हे वैद्यकीय अधिकारी आहेत तर प्रशांत बापूराव चोटपगार असे कंपाऊडरचे नाव आहे. तक्रारदाराचे आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे वेतन थकले होते. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या मंजूर रकमेचा धनादेश काढण्यासाठी डॉ. केंद्रे यांनी २५ हजार रूपयांची लाच मागितली होती. परिस्थिती हलाखीची असल्याने तक्रारदाराने पैसे देण्यास नकार दिला. मात्र, केंद्रे यांनी ऐकले नाही. अखेर संतापलेल्या कर्मचाºयाने थेट एसीबी कार्यालय गाठून ६ डिसेंबर रोजी तक्रार नोंदविली. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी पथकामार्फत शनिवारी भावठाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सापळा लावला. कर्मचाºयाकडून थेट लाच स्वीकारण्याऐवजी हे पैसे कंपाऊडर प्रशांतकडे देण्यास केंद्रे यांनी सांगितले. त्याप्रमाणे कर्मचाºयाने प्रशांतकडे पैसे देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाºयांनी झडप घालत त्याला पकडले. त्यानंतर डॉ.केंद्रेला त्यांच्या कक्षातून अटक केली. दोघांविरोधातही अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे सुरू होते.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, विकास मुंडे, दादासाहेब केदार, अमोल बागलाने, मनोज गदळे, चालक नदीम यांनी केली.उपचार करणाºया हातांत बेड्याडॉक्टर पदवी मिळताच रूग्णसेवा करण्याची शपथ घेतली. मात्र, भावठाणच्या आरोग्य केंद्रात रूग्णांना कसल्याच सुविधा नव्हत्या. आलेल्या रूग्णांवर तात्काळ उपचार केले जात नव्हते. येथील अधिकारी, कर्मचारीही रूग्णांना व्यवस्थित वागणूक देत नव्हते. एवढेच नव्हे तर येथील डॉक्टरांनी मागील काही दिवसांपासून रूग्णांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ‘इतर’ कामांतच जास्त स्वारस्य दाखविले. त्यामुळेच या उपचार करणाºया हातांमध्ये बेड्या पडल्या, अशी चर्चा दिवसभर होती.

टॅग्स :BeedबीडAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागdoctorडॉक्टरArrestअटक