शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सलग २४ तासांच्या डबल ड्युटीने जीव गेला; रेल्वे स्टेशन मास्तराचा हृदयविकाराने खुर्चीवरच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:26 IST

दिवसपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रात्र पाळी लावल्याने त्यांच्यावर मोठा ताण वाढत आहे.

अंबाजोगाई - तालुक्यातील घाटनांदुर रेल्वे मास्तरने सलग २४ तास ड्युटी केली. मध्यरात्री ड्युटीवर असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच बसल्या ठिकाणी खुर्चीवरच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे सिग्नल न मिळाल्याने दोन रेल्वे सुमारे तीन तास परळी आणि पानगावच्या रेल्वे स्थानकातच अडकून पडल्या होत्या. ही घटना आज सोमवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास घडली.

मुसाफिर सिंह (वय ४४, रा. बिहार) असे त्या स्टेशन मास्तरचे नाव आहे. परळी ते हैद्राबाद या रेल्वे मार्गावरील घाटनांदूर रेल्वे स्थानकात ते स्टेशन मास्तर म्हणून कर्तव्यावर होते. रविवारी (दि.२७) सकाळी ते १२ तासांच्या ड्युटीसाठी स्थानकात रुजू झाले. रात्रपाळीच्या ड्युटीवर असणारे स्टेशन मास्तर प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे मुसाफिर यांना त्यापुढील सलग ड्युटी करण्यासाठी स्थानकातच थांबावे लागले. सोमवारी वेळेस मुसाफिर यांचे बसल्या जागी खुर्चीवर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दरम्यान पानगाव (रेणापुर ) येथे कार्यरत असलेले रेल्वे स्टेशन मास्तर नितीन संभारे यांनी पनवेल परळी रेल्वेला लाईन मिळण्यासाठी मुसाफिर सिंह यांच्याशी पावने चारच्या सुमारास दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

परंतु, ते दुरध्वनी उचलत नसल्याने त्यांनी अंबाजोगाई ते अहमदपुर मार्गावर असलेले रेल्वे गेटमन विजय मिना यांना स्टेशन मास्तर फोन का उचलत नाहीत हे पाहण्यासाठी घाटनांदूर स्थानकात पाठविले. मिना यांनी तत्काळ स्थानकात जावून पाहिले असता मुसाफिर सिंह हे खुर्चीवरच मयत  अवस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तात्काळ सांबरे यांना घटनेची माहिती दिली. सांबरे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. दरम्यान, लाईन मिळत नसल्याने पनवेल ते परळी ही पानगाव रेल्वे स्थानकात तर काकीनाडा- शिर्डी एक्सप्रेस परळी रेल्वे स्थानकात दिड तासापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार सांबरे यांनी घाटनांदुर रेल्वे स्थानकात येवून दोन्ही गाड्यांना सिग्नल दिला आणि त्यांना मार्गाक्रमित केले. दरम्यान, काकीनाडा एक्सप्रेस व पनवेल एक्सप्रेस गाड्यातील प्रवाशी रेल्वे थांबल्याने मोठ्या चिंतेत सापडले होते. रेल्वे सुरळीत झाल्यानंतर प्रवाशांनाही धीर आला.

अतिरक्त ड्यूटी केल्याने स्टेशन मास्तरचा मृत्यूरेल्वे खात्यामध्ये बारा तासाची ड्यूटी देण्यात आलेली आहे. परंतु दिवसपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच रात्र पाळी लावल्याने त्यांच्यावर मोठा ताण वाढत आहे. याच ताणावमुळे घाटनांदुरच्या रेल्वे स्टेशन मास्तरचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे खात्याने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. सिग्नल न मिळाल्याने मोठी घटना टळली असली तरी यापुढे रेल्वे खात्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडrailwayरेल्वे