शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ तीर्थक्षेत्रासाठी २० कोटी रुपये मंजुर; मुंडे बहिण-भावांचा श्रेयासाठी दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2022 16:37 IST

माजी मंत्री धनंजय मुंडे, पंकजा मुंडे म्हणतात आपण सरकार कडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला निधी

परळी (बीड) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयास  चालना दिली असून यासाठी २० कोटी रूपये पुरवणी मागणी अंतर्गत नुकतेच मंजूर केले आहेत. दरम्यान, निधीसाठी दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे तर सातत्याने पाठपुरावा केला म्हणून निधी मिळाल्याचा दावा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

परळी शहर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीसह दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दरम्यान, प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा युतीच्या मागील सत्तेत मंजूर झाला. या आराखड्यातील कामांसाठी यापूर्वी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता.  या निधीतून २० कोटीच्या भक्त निवासाचे बांधकाम  सध्या  प्रगतीपथावर आहे. आता आणखी २० कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. 

दोन वेळा घेतली मुख्यमंत्र्यांची भेटमाजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, हा आराखडा जशास तसा  मंजूर करावा आणि त्याला गती द्यावी अशी मागणी आपण यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली होती. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सरकारने या मागणीची दखल घेऊन पुरवणी मागणीद्वारे या आराखडय़ासाठी २० कोटी रूपये मंजूर केले आहेत. 

सातत्याने पाठपुरावा केलामाजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, यासाठी आपण मंत्री असताना सातत्याने पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना आपण नगर विकास विभागाचा माध्यमातून सुमारे 133.58 कोटी रुपयांच्या परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता प्राप्त करून दिली होती. यातून याआधीही एका भव्य भक्त निवासासह विविध कामे करण्यात येत आहेत.  आता आणखी 20 कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या मधून मंजूर झाले आहेत.

५०० कोटींच्या निधींची मागणी करणार परळी वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच शहरांमध्ये भाविकांसाठी पूरक सुविधा उपलब्ध नाहीत. याचा विचार करून राज्य शासनाने ज्या पद्धतीने नुकताच पंढरपूर कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला व त्यास 300 कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिला त्याच धर्तीवर परळीला देखील परळी वैद्यनाथ कॉरिडॉर मंजूर करून येथे ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी मागणी धनंजय मुंडे या अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीड