शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; २ घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 01:05 IST

खंडोबा मैदान परिसरातील कॉलनीमध्ये रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालुन दोन घरे फोडली

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : शहरातील खंडोबा मैदान परिसरातील कॉलनीमध्ये रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घालुन दोन घरे फोडली मात्र काही हाती लागत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी सेवानिवृत्त अभियंता सुरेश कुलकर्णी मोगरेकर यांना जबर मारहाण व जखमी करून पळ काढल्याची घटना घडली तर दुस-या ठिकाणी निवृत्ती डाके हे यात्रेसाठी बाहेरगावी गेल्याने त्यांच्या घरातील किती ऐवज चोरीला गेला याची माहिती मिळू शकली नाही.रविवारी पहाटे एक ते सव्वा दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी नदीपात्रातून पॉवर हाउसच्या बाजुच्या गल्लीतूनन कॉलनीत प्रवेश केला. जगदीश बादाडे, पोरे सर यांचे घरास बाहेरून कड्या लावीत हे चोरटे कोणते घर रिकामे मिळते याचा शोध घेत फिरत होते. पुढे त्यांनी माजी नगरसेवक इनायत खान यांच्या घरासमोरील इतर घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यानंतर निवृत्ती डाके यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून तेथील चॅनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील व दुसऱ्या खोलीतील कपाट व उघडून त्यातील कपडे व सोने, चांदीच्या दागिन्यांचे बॉक्स उचकटून टाकले. डाके हे तीर्थयात्रेसाठी दोन दिवसांपूर्वीच सहकुटुंब गेल्याने त्यांच्या घरातून किती ऐवज चोरीला गेला हे समजू शकले नाही.त्यानंतर चोरट्यांनी बाजुच्या कंपाउंडमधुन उड्या टाकुन सुरेश कुलकर्णी यांच्या घराकडे मोर्चा वळविला. चॅनल गेट व इतर तीन दारवाजांचे कुलूप तोडून त्यांच्या एका खोलीतील कपाट उचकटले. काहीच हाती न लागल्याने बेडरूमचा दरवाजा तोडला. तिथे सुरेश कुलकर्णी यांनी प्रतिकार करताच त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामध्ये कुलकर्णी यांच्या डोक्यास व हातास मार लागून मोठा रक्तस्त्राव झाला. कुलकर्णी कुटुंबीयांना आरडा - ओरड केल्याने चोरटे पळून गेले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेतली.पोलीस निरीक्षक सुलेमान हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसेतज्ज्ञ,श्वान पथक,दरोडा प्रतिबंधक पथकाने भेटी दिल्या. श्वानाने बेकरीपर्यंत माग काढला. तेथून चोरटे नदीपात्रात उतरून पळून गेले असा अंदाज आहे.तर दुपारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डीसले यांनीही भेट दिली.

टॅग्स :theftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस